Bay Of Bengal: मे अखेरीस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घालणार कहर... हवामान तज्ज्ञांचा मोठा इशारा; महाराष्ट्राला बसणार मोठा फटका?

Cyclone: चक्रीवादळ तीव्र करण्यासाठी उबदार पाणी पुरेसे आहे. त्यामुळे कमी दाबाच्या टप्प्यात त्याची ताकद वाढण्याची शक्यता आहे. 24 मे नंतर डिप डिप्रेशन येण्याची शक्यता आहे.
Cyclone forming in the Bay of Bengal is likely to hit the states of Odisha, Maharashtra and Gujarat
Cyclone forming in the Bay of Bengal is likely to hit the states of Odisha, Maharashtra and GujaratEsakal
Updated on

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळामुळे 23 ते 27 मे दरम्यान ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई नॉकास्टने दिली आहे.

यामुळे 28 मे 2024 च्या आसपास गुजरात आणि मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Cyclone forming in the Bay of Bengal is likely to hit the states of Odisha, Maharashtra and Gujarat)

सध्या, हे चक्रीवादळ तीव्र होत आहे आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशाच्या अनेक भांगांवर त्याचा परिणाम होणार आहे.

भारतीय हवामान खात्याने मात्र अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

दरम्यान, हवामान विभागाने 23 मे पर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

"पुढील 7 दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे," असे IMD ने आपल्या नव्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये 23 मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Cyclone forming in the Bay of Bengal is likely to hit the states of Odisha, Maharashtra and Gujarat
Watch Video: एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?

हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर एक नव्हे तर दाबाचे दोन पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रावर 22 मेपर्यंत कमी दाबाचा तर बंगालच्या उपसागरावरही 23 मेपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो.

बंगालच्या उपसागराचे वाढणारे पाणी हे त्यामागचे कारण आहे. चक्रीवादळ तयार होण्यासाठी सामान्यतः समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 26.5 अंश सेल्सिअस असते. हे तापमान किमान 50 मीटर खोलीपर्यंत राखले पाहिजे.

Cyclone forming in the Bay of Bengal is likely to hit the states of Odisha, Maharashtra and Gujarat
हवेत उडणाऱ्या विमानात अचानक वाजला फायर अलार्म, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग...नेमकं काय घडलं?

सध्या बंगालच्या उपसागरात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 30-31 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. चक्रीवादळ तीव्र करण्यासाठी उबदार पाणी पुरेसे आहे. त्यामुळे कमी दाबाच्या टप्प्यात त्याची ताकद वाढण्याची शक्यता आहे. 24 मे नंतर डिप डिप्रेशन येण्याची शक्यता आहे. नंतर चक्रीवादळाची ताकद वाढू शकते.

मात्र, हवामान खात्याने अद्याप चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही. चक्रीवादळ जरी तयार झाले तरी त्याचा प्रभाव फार मोठा असेल अशी अपेक्षा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.