PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपला धक्का! भाजप नेत्याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांनंतर 8 एप्रिल रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांना पोलिसांनी काल (मंगळवार-बुधवार ४-५ एप्रिल) मध्यरात्री त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांनंतर 8 एप्रिल रोजी राज्याच्या दौऱ्यावर येत असतानाच तेलंगणा भाजप प्रमुखांना अशा वेळी ताब्यात घेण्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी रात्री उशिरा करीमनगर येथील बंदी संजयच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले आहे.

बंदी संजय कुमार यांना ताब्यात घेत असताना भाजप नेत्याचे समर्थक व कार्यकर्त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदी संजय कुमार यांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले. वृत्तानुसार, भाजप नेत्याला नलगोंडा जिल्ह्यातील बोम्माला रामाराम पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. अटकेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Narendra Modi
Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट; राजकीय नेत्याचा...

बंदी संजय कुमारच्या अटकेला विरोध करत भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमेंदर रेड्डी यांनी सांगितले की, भाजपच्या प्रदेश युनिटचे अध्यक्ष बंदी संजय यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. करीमनगर येथील राहत्या घरातून त्याला अवैधरित्या पकडण्यात आले आहे.

Narendra Modi
पोलिसांच्या आराग्याकडे कोण पाहणार? ३६५ पैकी १८० ते २८० दिवस बंदोबस्ताचीच ड्यूटी; कुटुंबाकडे दुर्लक्ष

तेलंगणातील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. रेड्डी यावेळी बोलताना म्हणाले की, "एका खासदाराविरुद्ध मध्यरात्री अशी कारवाई करण्याची काय गरज होती? गुन्हा काय आहे आणि खटला काय आहे? ते आम्हाला काहीच सांगत नाहीत. पेपरफुटीवरून ते राज्य सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली आहे हे लोकशाहीच्या विरोधात आहे."

Narendra Modi
Donald Trump: पॉर्न स्टार प्रकरणात अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()