उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे आज स्कूल व्हॅनवर गोळीबार आणि दगडफेकीची भयंकर घटना घडली आहे. यावेळी 4 अनोळखी तरुणांनी गोळीबार करत स्कूल व्हॅनवर दगडफेक केली.
गोळीबार होत असल्याचे पाहून व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांनी आरडाओरडा सुरू केला. हल्ला होत असल्याचे पाहून चालकाने व्हॅन वेगाने पळवत सुरक्षित ठिकाणी नेली. दरम्यान स्कूल व्हॅनमध्ये इयत्ता चौथीची मुले प्रवास करत होती.
बस चालकाने शहाणपण दाखवत गोळीबार करणाऱ्या लोकांपासून व्हॅन शाळेपर्यंत नेली आणि मुलांचे प्राण वाचवले. स्कूल बसवर गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झालेल्या एसआरएस इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही घटना घडली.