PM Security Breach: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक करणे 7 पोलिसांना पडले महागात; काय आहे प्रकरण?

PM Modi Security Breach
PM Modi Security Breachesakal
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये चूक केल्याप्रकरणी पंजाबमधील सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या प्रचारासाठी 5 जानेवारी रोजी पंजाब दौऱ्यावर गेले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांचा ताफा उड्डाण पूलावर २० मिनिटांसाठी अडकून पडला होता. (A total of seven police officers have been suspended in connection with the security breach during Prime Minister Narendra Modi)

पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यातील या निष्काळजीपणामुळे फिरोजपूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निष्काळजीपणासाठी भाजपने तत्कालिन चरणजिंत सिंग चन्नी सरकारला दोषी ठरवले होते. दुसरीकडे, काँग्रेसने म्हटलं होतं की, मोदींचा नियोजित मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला होता.

PM Modi Security Breach
Narendra Modi: केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणू; शिवसेनेच्या मंत्र्याने दिले पदाधिकाऱ्याना निर्देश

मोदींचा ताफा ताडकळत ठेवल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. भगवंत मान यांच्या नेतृत्वातील आप सरकारने याप्रकरणी सात पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यात तेव्हाचे फिरोझपूरचे पोलिस प्रमुख आणि आताचे एसपी गुरुबिंदर सिंग, डीएसपी दर्जाचे पोलिस अधिकारी परसन सिंग, जयदीश कुमार, इन्स्पेक्टर जतिंद्र सिंग आणि बलविंदर सिंग, सब इन्स्पेक्टर रमेश कुमार यांचा समावेश आहे.

PM Modi Security Breach
Narendra Modi: PM मोदींचा आणखी एक नवा विक्रम! 'या' ठिकाणी जाणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

ऑर्डरमध्ये सांगण्यात आलंय की, सर्व सात पोलिस अधिकाऱ्यांवर पंजाब सिव्हिल सर्व्हिसेस (पनिशमेंट आणि अपिल) नियम ८ नुसार कारवाई होईल. या नियमांतर्गत अधाकाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याची देखील तरतूद आहे. दरम्यान, मोदी यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याने मोठा गदारोळ झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.