Viral Video: हैदराबादमधील मशिदीवर भाजप उमेदवार माधवी लतांचा 'बाण मारण्याचा' व्हिडिओ व्हायरल

Madhavi Latha: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शांतता धोक्यात आली आहे. त्यांच्या अशा कृतीतून कोणता संदेश दिला जात आहे? त्या ठिकाणी मी असतो तर तुम्ही माझ्यावर तुटून पडला असता.
Madhavi Latha Viral Video
Madhavi Latha Viral VideoEsakal
Updated on

Asaduddin Owaisi Slams Madhavi Latha:

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कोम्पेल्ला माधवी लता यांनी नुकत्याच झालेल्या रामनवमीच्या मिरवणुकीत एका मशिदीवर काल्पनिक बाण मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

व्हिडिओमध्ये माधवी लता आपल्या पाठीवरुन काल्पनिक बाण काढून तो एका मशिदीकडे बाण सोडत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओवरून झालेल्या वादानंतर माधवी लता यांनी स्पष्टीकरण जारी करत हा व्हिडिओ अपूर्ण आणि एडिट असल्याचा दावा केला आहे. (A video of BJP candidate Madhavi Lata 'shooting an arrow' at a mosque in Hyderabad has gone viral)

दरम्यान भाजप उमेदवार माधवी लता यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

अशात माधवी लता यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, नकारात्मकता निर्माण करण्यासाठी त्यांचा एक अपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. माधवी लता म्हणाल्या, “मी स्पष्ट करू इच्छिते की हा एक अपूर्ण व्हिडिओ आहे आणि अशा व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागू इच्छिते कारण मी सर्व व्यक्तींचा आदर करते.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले की, हैदराबादच्या जनतेने भाजपचे मनसुबे पाहिले आहेत. भाजप-आरएसएसची अश्लील आणि चिथावणीखोर कृती त्यांना मान्य होणार नाही. भाजप ज्या 'विकसित भारता'बद्दल बोलत आहे तो हाच आहे का?... मला विश्वास आहे की तेलंगणातील लोक भाजपच्या विरोधात मतदान करतील."

यावेळी प्रसार माध्यमांवर टीका करताना ओवेसी म्हणाले, "भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शांतता धोक्यात आली आहे. भाजप आणि आरएसएसकडून धार्मिक स्थळाजवळ जे अशोभनीय कृत्य केले जात आहे ते तुम्ही लोक दाखवत नाही. त्यांच्या अशा कृतीतून कोणता संदेश दिला जात आहे? त्या ठिकाणी मी असतो तर तुम्ही माझ्यावर तुटून पडला असता.

Madhavi Latha Viral Video
Satellite Aryabhatta : भारताच्या पहिल्या उपग्रहाचा खर्च किती होता? नाव कसं ठरलं? वाचा 'आर्यभट्ट'ची चित्तरकथा!
Madhavi Latha Viral Video
Satara Lok Sabha : जनतेनं ठरवलंय उदयनराजेच खासदार, आजचा फक्त 'ट्रेलर' तर मतदानादिवशी दिसणार 'पिक्चर' - CM शिंदे

कोण आहेत माधवी लता?

डॉ. माधवी लता या विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. त्या भरतनाट्यम डान्सर देखील आहेत. तसेच अनेकदा हिंदुत्वासाठी आवाज उठवताना दिसतात. हैदराबादमध्ये सामाजिक कार्यासाठीही त्यांची ओळख आहे.

माधवी लता यांच्या कार्याची दखल घेत भाजपने प्रथमच हैदराबादमध्ये एक महिलेला उमेदवारी दिली आहे.

2019 च्या निवडणुकीत भाजपने भागवत राव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भागवत यांना ओवेसींकडून सुमारे तीन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

यावेळी भाजपने महिला उमेदवार उभे करून लढत चुरशीचा करण्याचा प्रयत्न केला असला तरी ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करणे सोपे जाणार नाही. आता ओवेसींच्या बालेकिल्ल्यात हिंदुत्वाचा चेहरा जिंकतो का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.