एका वेळी महिलेने दिला चक्क पाच मुलांना जन्म, मात्र...

महिलेच्या घरी अनेक वर्षांनी बाळाच्या येण्याने आनंदमय वातावरण होते. मात्र काही क्षणात हे वातावरण दु:खात बदलेले.
A women gave birth to five childeren at a time, but alll died after birth
A women gave birth to five childeren at a time, but alll died after birth esakal
Updated on

राजस्थानमध्ये एका महिलेने एकावेळी चक्क पाच मुलांना जन्म दिला. सात वर्षानंतर ही महिला गरोदर झाली होती. लग्नानंतर अनेक वर्ष या महिलेला मूल झाले नव्हते. तब्बल सात वर्षांनी या महिलेला आई होण्याचं सुख लाभलं.त्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. महिलेच्या घरी अनेक वर्षांनी बाळाच्या येण्याने आनंदमय वातावरण होते. मात्र काही क्षणात हे वातावरण दु:खात बदलेले. (A woman gave birth to five childerns at a time unfortunately all died after birth)

मासलपुर क्षेत्रातील पिपरानी गावातील रेशमाने सोमवारी सकाळी एकावेळी पाच मुलांना जन्म दिला होता. या महिलेची वेळेआधीच म्हणजेच सात महिन्यातच प्रसुती झाली होती. त्यामुळे प्रसुतीनंतर तिची पाचही मुलं नाजूक जन्माला आली होती.डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पाच मुलांच्या जन्माच्या वेळेत एक ते दीड मिनिटांचं अंतर होतं. पाचही मुलांचं वजन ३०० ते ६०० ग्राम होतं. महिलेने 2 मुले आणि तीन मुलींना जन्म दिला होता. यातील २ मुले आणि दोन मुलींचा उपचारासाठी जयपुरच्या रूग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर उरलेल्या एका मुलीने जयपुरच्या रग्णालयात पोहोचल्यावर अखेरचा श्वास सोडला.

A women gave birth to five childeren at a time, but alll died after birth
Corona Death: लस न घेतल्याने राज्यात अधिक मृत्यू

पहिल्यांदाच गर्भधारणेनंतर या महिलेने एका वेळी पाच मुलांना जन्म दिला होता. मात्र दुर्दैवाने यातील एकाही मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले नाही. या दुखद घटनेनंतर महिलेबाबत सगळीकडे हळहळ व्यक्त केली जातेय. जज्ञांच्या मते, प्रसुतीदरम्यान लाखो महिलांमधून एकाच्या बाबतीत अशी घटना घडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.