कोरोना संकटाच्या (Covid-19) काळात UIDAI नं (Unique Identification Authority of India) आधार कार्ड संदर्भात दिलासा दिला आहे. शनिवारी UIDAI कोरोना संकट काळात आधारबाबत एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. लसीकरणासाठी अथवा कोरोना संदर्भातील कोणत्याही उपचारासाठी आधार कार्ड सक्तीचं नाही. एखाद्याकडे आधारकार्ड नसेल तरिही ती व्यक्ती लसीकरण (vaccine) अथवा कोरोनासंबधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकते. काही लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लसीकरण आणि इतर आत्यावश्याक कामांसाठी अडथळे येत असल्यामुळे UIDAI हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Aadhaar not mandatory for Covid-19 treatment and vaccine)
UIDAI शनिवारी स्पष्ट केलं की, आधार कार्डसाठी एक्सेप्शन हँडलिंग मॅकेनिज्म (ईएचएम) तयार करण्यात आलं आहे. ज्याचं 12 अंकी बायोमेट्रिक आयडीनुसार सुविधा आणि सेवा दिल्या जातात. तसेच संबधित नियमांचं पालनही केलं जातं. आधारकार्ड (Adhar card) महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून ओळखलं जातं. पण आधारकार्ड नसल्यामुळे कुठल्याही सेवा नाकारता येत नाहीत. आधारकार्डशिवाय महत्वाची कामं होऊ शकतात.
ज्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसेल त्यांना कोरोना लस, औषधे, रुग्णालयात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. तसेच, आधारकार्ड नसेल तर कोणतीही आवश्यक सेवा नाकारत येऊ शकत नाहीत. आधारकार्ड नसल्यामुळे एखाद्याला आवश्यक वस्तू मिळत नसल्यास किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास अडथळे येत असतील तर एजन्सी किंवा विभागास आधार अधिनियम, 2016 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार त्याला सेवा द्यावी लागेल, असे UIDAIने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.