नवी दिल्ली : कोरोना विरोधात सुरु असलेल्या लसीकरणासाठी कोविनवर (Cowin App) नोंदणीसाठी आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य नाही, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च (Supreme court) न्यायालयात दिली आहे. लसीकरणासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड यासह नऊ ओळखपत्रांपैकी फक्त एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे. (Aadhaar not mandatory for COVID-19 vaccination)
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार कार्ड, रेशनकार्ड यासह नऊ ओळखपत्रांपैकी एकाचा वापर करून लसीकरणासाठी नोंदणी करता येते, असे देखील कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले.
या प्रकरणी नोटीस जारी करण्यात आली होती, ज्यानुसार कोविन अॅपवर फक्त आधार कार्डचा प्रचार केला जात असल्याचे सांगत, केवळ आधार नसल्यामुळे लसीकरण नाकारण्यात आल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली होती. गेल्या महिन्यात 15 जानेवारी 2022 पर्यंत देशात 156 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहे. देशात 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स असलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.