Aadhar Security : जनतेला आता सुरक्षित ‘आधार’; गैरवापर होताच मिळणार अलर्ट

देशात कोणीही कुठेही तूमचं आधार वापरलं तर लगेच समजणार? कसे ते जाणून घ्या!
Aadhar Security
Aadhar Securityesakal
Updated on

देशातील लोकांचे आधार आता अधिक सुरक्षित झाले आहे. त्यामूळे देशभरात कुठेही तूमची फसवणूक केली जात असेल तर ते तूम्हाला लगेच समजू शकते. असे फसवणूकीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा केल्या आहेत.

Aadhar Security
Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भारतात लोकांना आकार नंबर देत सर्वत्र आधार कार्ड बनवते. UIDAI ने या आठवड्यात आधार संबंधीत सुरक्षेसाठी नवीन द्वि-स्तरीय सुरक्षा यंत्रणा सुरू केली आहे. यात आधार-बेस्ड फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि स्पूफिंग प्रयत्नांची जलद ओळख याचा समावेश आहे.

Aadhar Security
Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा

UIDAI च्या मते, आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि मशीन लर्निंग (AI/ML) आधारित सुरक्षा प्रणाली आता कॅप्चर केलेल्या फिंगरप्रिंटची सजीवता तपासण्यासाठी "फिंगर माइनुटिया  आणि फिंगर इमेज" या दोन्हींचा वापर करेल.

Aadhar Security
Jalgaon : 9 लाख मतदारांचे Voter ID- Aadhar लिंकिंग; रावेर तालुका आघाडीवर

यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर आधारित ही सुरक्षा यंत्रणा प्राधिकरणानेच विकसित केली आहे. आधार कोणत्या व्यक्तीचे आहे हे तपासण्यासाठी आधारकार्डवर असलेल्या बोटांचे ठसे तपासले जातात.

Aadhar Security
Aadhar Card For NRI: आता एनआरआयसुद्धा आधारसाठी अर्ज करू शकतात?

संबंधीत व्यक्तीच्या फिंगरप्रिंटची सत्यता पडताळण्यासाठी कार्डवर असलेल्या फिंगरप्रिंट पॅटर्न यात बोटाच्या गडद आणि हलक्या रेषांची सत्यता पडताळते. तर द्विस्तरीय प्रणालीमध्ये आधारचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते.

Aadhar Security
Aadhar Pan Linking: पॅन कार्ड अजूनही लिंक केलेलं नाही? लगेच करा नाहीतर... वाचा डेडलाइन अन् प्रोसेस

काय आहेत याचे फायदे

- देशात कुठेही तूमचे आधारकार्ड दुसरा कोणी व्यक्ती वापरत असेल तर ते लगेच समजेल.

- आधार आधारित पैशाचे व्यवहार सुरक्षित होतील.

- गुन्हेगारांकडून आधारचा गैरवापर करण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल.

- बँकिंग आणि आर्थिक, दूरसंचार आणि सरकारी क्षेत्रात हे अत्यंत उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.