Delhi Polls: महाराष्ट्र आणि झारखंड मधील निवडणुकांचा निकाल येण्याआधीच आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यातील 6 उमेदवारांनी नुकतंच भाजप आणि काॅंग्रेस सोडून आप मध्ये प्रवेश केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी या 6 नेत्यांचा पहिल्या यादीत समावेश केला आहे. यातील भाजपमध्ये आमदार राहिलेल्या दोन नेत्यांचा समावेश आहे.