Arvind Kejriwal: केजरीवालांना त्यांच्याच सरकारचा मोठा धक्का; 'आप'ला बजावली 164 कोटी वसुलीची नोटीस!

याआधीही एलजी सक्सेना यांनी आम आदमी पार्टी आणि सरकारला अनेक धक्के दिले आहेत.
Aam Aadmi Party Arvind Kejriwal
Aam Aadmi Party Arvind Kejriwalesakal
Updated on
Summary

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना त्यांच्याच सरकारचा (AAP Government) मोठा धक्का बसलाय.

नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्षाचं (Aam Aadmi Party) सरकार आणखी अडचणीत सापडल्याचं दिसतंय. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना त्यांच्याच सरकारचा (AAP Government) मोठा धक्का बसलाय.

दिल्ली सरकारच्या DIP म्हणजेच, माहिती आणि प्रचार संचालनालयानं केजरीवालांना (आप सरकार) सुमारे 164 कोटी रुपयांची वसुली नोटीस जारी केलीये. जी 10 दिवसांच्या आत जमा करण्यास सांगितलंय. प्रत्यक्षात, सरकारी जाहिरातींच्या आडून राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाला एकूण 163.62 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आलीये.

Aam Aadmi Party Arvind Kejriwal
Jalebi Baba : 1, 2 नव्हे तर तब्बल 120 महिलांवर 'जिलेबी बाबा'नं केला बलात्कार; चहात मिसळायचा नशेच्या गोळ्या!

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना (Lieutenant Governor V. K. Saxena) यांनी मुख्य सचिवांना सरकारी जाहिरातींच्या नावाखाली प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठी आम आदमी पक्षाकडून 97 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही घडामोड घडलीये.

उपराज्यपालांच्या निर्देशानंतर, दिल्ली सरकारच्या माहिती आणि प्रचार संचालनालयानं (Directorate of Information and Publicity) ही नोटीस जारी केलीये.

Aam Aadmi Party Arvind Kejriwal
Narendra Modi : उद्घाटनापूर्वीच 'वंदे भारत एक्सप्रेस'वर पुन्हा दगडफेक; नव्या ट्रेनला मोदी दाखवणार होते हिरवा झेंडा

माहिती आणि प्रचार संचालनालयानं (DIP) जारी केलेल्या वसुलीच्या नोटीसमध्ये रकमेवरील व्याजाचा समावेश आहे.

दिल्लीतील सत्ताधारी AAP नं 10 दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरणं बंधनकारक असणार आहे. याआधीही दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना यांनी आम आदमी पार्टी आणि सरकारला अनेक धक्के दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.