माफी मागणार नाही म्हणत 'आप'च्या नेत्यानं पत्रकार परिषदेतच फाडली उपराज्यपालांची नोटीस

'भारतीय संविधानानं मला सत्य बोलण्याचा अधिकार दिलाय.'
Aam Aadmi Party leader Sanjay Singh
Aam Aadmi Party leader Sanjay Singhesakal
Updated on
Summary

'भारतीय संविधानानं मला सत्य बोलण्याचा अधिकार दिलाय.'

नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना (Vinay Kumar Saxena) यांच्यातील लढाई तीव्र झालीय. ताज्या घडामोडीनुसार, नायब राज्यपालांच्या नोटिसीसंदर्भात आज (बुधवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षानं उपराज्यपालांची माफी मागणार नसल्याचं म्हटलंय.

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह (Sanjay Singh) यांनी या विषयावरील आयोजित पत्रकार परिषदेत नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिसीची प्रत फाडलीय. संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत उपराज्यपाल सक्सेना यांच्या मानहानीच्या नोटिसीची प्रत फाडली आणि ते म्हणाले, 'मी सक्सेना यांना सांगू इच्छितो की, भारतीय संविधानानं मला सत्य बोलण्याचा अधिकार दिलाय. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य म्हणून मला सत्य बोलण्याचा अधिकार आहे. कुठल्यातरी भ्रष्ट व्यक्तीचं ऐकून नोटीस पाठवत असाल तर, मी घाबरणार नाही. अशा नोटिसा मी 10 वेळा फाडल्या आणि फेकून दिल्या आहेत.'

Aam Aadmi Party leader Sanjay Singh
Love Affair : दोघांचं एकाच लेडी कॉन्स्टेबलवर जडलं 'प्रेम'; गोळीबार करत ठाण्यातच हाणामारी

असं सांगतच पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी सक्सेनांची नोटीस फाडली. यादरम्यान त्यांनी उपराज्यपालांच्या नोटीसवर माफी मागणार नसल्याचंही स्पष्ट केलं. दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना यांनी आम आदमी पार्टीच्या काही नेत्यांना फेक बातम्यांद्वारे प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवलीय. उपराज्यपालांनी आप नेते आतिशी, दुर्गेश पाठक, सौरभ भारद्वाज, संजय सिंह आणि जास्मिन शाह यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत, तसेच एलजीच्या विरोधात अपमानास्पद घोषणा दिल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवलीय. तीच नोटीस आप नेते संजय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत फाडली आहे.

Aam Aadmi Party leader Sanjay Singh
Delhi : राजपथ नव्हे, आता 'कर्तव्यपथ'; नाव बदलण्याच्या प्रस्तावाला NDMC कडून मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.