सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर केजरीवालांची प्रतिक्रियी, म्हणाले...

AAP Arvind Kejriwal on Case against Satyendar Jain completely fake and politically motivated
AAP Arvind Kejriwal on Case against Satyendar Jain completely fake and politically motivated sakal media
Updated on

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचे मंत्रीमंडळात आरोग्य मंत्री असणाऱ्या सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लॉंड्रींग प्रकरणात अटक केली आहे, यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ईडीने जैन यांना केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे, केजरीवाल यांनी ईडीची ही कारवाई “पूर्णपणे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे म्हटले आहे. (AAP Arvind Kejriwal on Case against Satyendar Jain completely fake and politically motivated)

आप हा एक प्रामाणिक राजकीय पक्ष आहे आणि या प्रकरणात एक टक्काही तथ्य असते तर मी स्वतः जैन यांच्यावर कारवाई केली असती, असे केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले.

"मी जैन यांच्यावरील खटल्याचा अभ्यास केला आहे. हे पूर्णपणे खोटी आणि राजकीय कारणांनी प्रेरित आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील," असे केजरीवाल म्हणाले.

सोमवारी काही तासांच्या चौकशीनंतर जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले, असे अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिकार्‍यांनी सांगितले.

AAP Arvind Kejriwal on Case against Satyendar Jain completely fake and politically motivated
Photo: फक्त काशीचं नाही, अहिल्याबाईंनी देशभरातील ५० मंदिराचा जीर्णोद्धार केलाय

भाजप आणि काँग्रेसने सोमवारी दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अटकेचे स्वागत केले आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारीमध्ये, केजरीवाल यांनी त्यांना सूत्रांकडून जैन यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते असे कळल्याचा दावा केला होता.

AAP Arvind Kejriwal on Case against Satyendar Jain completely fake and politically motivated
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 318 नवीन रुग्णांची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.