Lok Sabha Election : आघाडी धर्म म्हणून काँग्रेसला एक जागा देतोय, अन्यथा...; 'आप'च दिल्लीत ठरणार मोठा भाऊ?

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पंजाबमध्ये वेगवेगळे निवडणूकांना सामोरे जाणार आहेत.
Lok Sabha Election : आघाडी धर्म म्हणून काँग्रेसला एक जागा देतोय, अन्यथा...; 'आप'च दिल्लीत ठरणार मोठा भाऊ?
Updated on

Lok Sabha Election 2024 : आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पंजाबमध्ये वेगवेगळे निवडणूकांना सामोरे जाणार आहेत. तर राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आपने सातपैकी काँग्रेसला एक जागा देण्याची तयारी दाखवली आहे. आज (मंगळवार, १३ फेब्रुवारी) रोजी आपचे नेते संदीप पाठक यांनी याबद्दल माहिती दिली

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की दिल्लीत आप ७ पैकी ६ जागांवर निवडणूक लढवेल आणि फक्त एक जागा काँग्रेससाठी सोडणार आहे. आघाडी धर्म पाळू इच्छित आहोत पण जागावाटपासाठी होत असलेला उशीर योग्य नाही.

दिल्लीतील लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या शून्य जागा आहेत, विधानसभेत देखील शून्य जागा आहेत. एमसीडीमध्ये झालेल्या निवडणूकीत देखील २५० पैकी ९ जागा काँग्रेसला मिळाल्या. या आकडेवारीनुसार काँग्रेसला एकही जागा दिली जाऊ शकत नाही. पण डेटा महत्वाचा नाही. आघाडीचा धर्म आणि आघाडीचा मान राखून आम्ही त्यांना एक जागा देऊ करतो. आम्ही त्यांना एक सीट ऑफर करत आहोत. काँग्रेस एक, तर आप सहा जागांवर निवडणूक लढवेल.

आज उमेदवारांची घोषणा करणार नाहीत. पण दिल्लीच्या मुद्द्यावर चर्चा लवकर सुरू व्हावी. त्यातून लवकर निर्णय व्हावा, जर हे झालं नाही तर आम्ही सहा जागांवर तयारी सुरू करु असेही पाठक म्हणाले.

Lok Sabha Election : आघाडी धर्म म्हणून काँग्रेसला एक जागा देतोय, अन्यथा...; 'आप'च दिल्लीत ठरणार मोठा भाऊ?
Ashok Chavan Joins BJP : आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

आपचे खासदार पाठक पुढे बोलताना म्हणाले की, गोवा येथे दोन जागा आहेत. आम्ही काँग्रेससोबतच्या आघाडीचा विचार करता एका जागेवर उमेदवार जाहीर करत आहोत. दक्षिण गोवा येथे वेंजी आमचे खासदार आहेत. आम्ही त्यांना लोकसभा निवडणूकीचे उमेदवार घोषित करत आहोत.

गुजरातमध्ये आघाडीत आमच्याकडे आठ जागा आहेत. त्या पाहता गुजरातच्या भरूच येथून चैतर बसावा आणि भावनगर येथील उमेश भाई मखवाना यांची उमेदवारी घोषित करत आहोत. काँग्रेस या मागणीला पाठिंबा देईल असे आम्हाला वाटते.

Lok Sabha Election : आघाडी धर्म म्हणून काँग्रेसला एक जागा देतोय, अन्यथा...; 'आप'च दिल्लीत ठरणार मोठा भाऊ?
Balasaheb Thorat: अशोक चव्हाण गेले आता बाळासाहेब थोरातांकडे महत्त्वाची जबाबदारी; मल्लिकार्जुन खरगेंचा आला फोन

संदीप पाठक पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी जेव्हा जाहीर करण्यात आली तेव्हा देशात उत्साह होता. आघाडीचा उद्देश विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी काम करावे. आम्ही देखील यामध्ये सहभागी झालो होतो. याचा उद्देश निवडणूक लढणे आणि जिंकणे हा आहे. यासाठी वेळेवर उमेदवार घोषित करणे, प्रचार-प्रसाराचे काम करणे गरजेचे आहे.

त्यांनी सांगितलं की, आमची काँग्रेससोबत दोन वेळा बैठक झाली, मात्र त्यातून कोणताही निष्कर्ष निघाला नाही. यानंतर एक महिन्यापूर्वी देखील बैठक झाली, आधी न्याय यात्रेचं कारण देण्यात आलं. त्यानंतर काहीच सांगण्यात आलं नाही. काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याला मीटिंग काधी होणार याबद्दल काहीच माहिती नाहीय आज जड मनाने बोलावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.