AAP : आप का रामराज्य

केजरीवाल आणि मान सरकारची कामगिरी सांगणारे संकेतस्थळ
AAP
AAP esakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि पंजाबमधील भगवंत मान सरकारच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी आम आदमी पक्षाने रामनवमीचे औचित्य साधून ‘आप का रामराज्य” (आपचे रामराज्य) हे संकेतस्थळ आज सुरू केले.

AAP
Pune News : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या खडीमुळे वाहतुकीला धोका

राज्यसभा खासदार संजय सिंह, मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि आणि जस्मिन शाह यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत या संकेतस्थळास औपचारिकरीत्या सुरवात करण्यात आली. रामराज्य साकारण्यासाठी आप काम करत असून या संकेतस्थळावर पक्षाची रामराज्याची संकल्पना मांडण्यात आल्याचे या पत्रकार परिषदेत आपच्या नेत्यांनी सांगितले. आम आदमी पक्षाने पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये काय काम केले आहे, हे या संकेतस्थळावर पाहता येईल, असा दावा खासदार संजय सिंह यांनी केला.

AAP
NMC News : महापालिकेला यांत्रिकी झाडू देण्यास केंद्राचा नकार

तसेच मतदारांनी आपसोबत यावे, असे भावनिक आवाहनही केले. रामराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी आपने निर्धार केला असून मागील दहा वर्षात आपने दिल्लीत तीनदा सरकार स्थापन केले तसेच पंजाबमध्येही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केल्याचे संजय सिंह म्हणाले. आप सरकारने अशी कामे केली ज्याची जगभरात वाखाणणी होत असून अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नी देखील केजरीवाल यांनी तयार केलेल्या शाळा बघण्यासाठी आल्या होत्या, याचा उल्लेखही संजयसिंह यांनी केला. तर, मंत्री आतिशी यांनी दावा केला की भगवान राम यांनी ज्याप्रमाणे रामराज्यासाठी संघर्ष केला त्याच प्रकारे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबमधील लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

आपले जीवनमान सुधारण्यासाठी योग्य ठिकाणी मतदान कसे करता येईल हे जनतेला ‘आप का रामराज्य’ संकेतस्थळ पाहून ठरवता येईल, असेही मंत्री आतिशी म्हणाल्या. यावेळी आपच्या नेत्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले. दिल्लीतील विकास कामांमध्ये भाजपकडून आणि केंद्र सरकारकडून अडथळे आणले जात असल्याचे मंत्री आतिशी म्हणाल्या. तर, मंत्री सौरभ भारद्वाज यांनी रामराज्य ही कल्याणकारी राज्याची संकल्पना असल्याचे सांगितले. पंजाब आणि दिल्ली मॉडेलचा अर्थ देखील याच रामराज्याशी संबंधित असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()