AAP DP Campaign: आपनं लॉन्च केलं 'डीपी कॅम्पेन'; मोदी विरोधकांना डीपी बदलण्याचं केलं आवाहन

आतिषी यांनी पत्रकार परिषद घेऊन या कॅम्पेनची माहिती दिली तसेच फोटोही जाहीर केला.
AAP DP Campaign
AAP DP Campaign
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण आम आदमी पार्टीनं यावरुन दिल्लीत रान पेटवलं आहे. केजरीवालांच्या अटकेपासून पक्षानं तिथं आंदोलनं सुरु केली आहेत.

तसेच केंद्र सरकारवर टीकात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यातच आता आपनं डीपी कॅम्पेन सुरु केलं आहे. तसेच ज्यांचा मोदींना विरोध आहे त्या सर्व देशवासियांना आपले डीपी बदलण्याचं आवाहन केलं आहे. (AAP launched DP Campaign appealed to opponents of pm modi to change his social media DP)

AAP DP Campaign
Wedding Invitation: "गिफ्ट आणू नका पण मोदींना मत द्या"; लग्नपत्रिका जोरदार व्हायरल

आपनं पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

आपच्या नेत्या आणि प्रवक्त्या आतिषी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "अरविंद केजरीवाल यांची प्रेरणा घराघरात पोहोचवण्यासाठी आज संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर एक डीपी कॅम्पेनची सुरुवात आम्ही करत आहोत. आज दुपारी ३ वाजल्यापासून आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी आपले डीपी बदलणार आहेत" (Latest Maharashtra News)

AAP DP Campaign
Water Crisis: प्यायला पुरेसं पाणी नसताना लोक धुवत होते गाड्या; २२ नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल

यावेळी डीपीसाठी त्यांनी एक फोटो देखील पत्रकार परिषदेत सादर केला. यामध्ये तुरुंगाच्या गजांआड असलेले केजरीवाल दिसत आहेत तसेच त्यावर 'मोदी का सबसे बडा डर केजरीवाल' असा संदेश लिहिला आहे. (Latest Marathi News)

AAP DP Campaign
'भारत माता की जय', 'जय हिंद'चा नारा पहिल्यांदा मुस्लिम व्यक्तींनी दिला? केरळच्या मुख्यमंत्र्यांनी नावेही सांगितली

आतिषी पुढे म्हणतात, देशातील सर्व लोकांनाही मी आवाहन करु इच्छिते की जर तुम्ही अरविंद केजरीवालांचे समर्थक असाल, तुम्ही हुकुमशाही विरोधात आवाज उठवू इच्छित असाल, जर देशातील लोकशाही तुम्ही वाचवू इच्छित असाल, तसेच जर तुम्ही पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत आहेत, हा संदेश देऊ इच्छित असाल तर माझं सर्व देशवासियांना आवाहन आहे की हा फोटो त्यांनी डीपीवर ठेवावा. (Marathi Tajya Batmya)

माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही आपल्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जसं ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सर्व ठिकाणी हा डीपी ठेवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.