Arvind Kejriwal : 'आप'ची बँक खाती गोठविली जाणार; दिल्लीत धरणे दिल्यानंतर केजरीवालांचा आरोप

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात आज आपचे सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार व कार्यकर्त्यांसह दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयासमोर धरणे देण्याचा इशारा दिला होता.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
Updated on



नवी दिल्ली : आपच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन झाडू सुरू केले असून आपच्या सर्व नेत्यांना तुरुंगात डांबण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर आपचे सर्व बँकाचे खाते गोठविले जाणार असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. जेल का जवाब व्होटचे असे नारे देत भाजपच्या मुख्यालयाकडे जाणार्या आपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरच पोलिसांनी अडविले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात आज आपचे सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार व कार्यकर्त्यांसह दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयासमोर धरणे देण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी विभवकुमार यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपच्या मुख्यालवर धडक देण्याचा इरादा बोलून दाखविला होता.

आपच्या सर्व नेत्यांना भाजपने अटक करावी, असे आव्हान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता याच मार्गावर असलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयात सर्व नेते एकत्रित झाले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या मुख्यालयाकडे जात असताना हा रस्ता दिल्ली पोलिसांनी बंद केला होता. तसेच यावेळी दिल्ली पोलिसांनी कलम 144 लावले असल्याने पाच पेक्षा अधिक जमाव करता येणार नव्हते.

Arvind Kejriwal
Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

आपच्या कार्यालयासमोरली रस्त्यावर मुख्यमंत्री केजरीवाल व सर्व नेत्यांना अडविल्यानंतर ते रस्त्यावरच धरण्यावर बसले. पंतप्रधान मोदींना आम्ही अर्धा तास वेळ देतो, या काळात भाजपने सर्व नेत्यांना अटक करून दाखवावी, असे आव्हान दिले. परंतु अर्धा तासात कुणालाही अटक करण्यात आली नाही. यावेळी मंत्री आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांच्यासह खासदार संजय सिंग, खासदार संदीप पाठक सर्व खासदार व आमदारही उपस्थित होते. जब जब मोदी डरता है, पोलिस को आगे करता है, लोकतंत्र मे हिटलरशाही नहीं चलेगी, जेल का जवाब, व्होटसे, असे नारे देण्यात आले.

Arvind Kejriwal
Lok Sabha Election 2024 : 'माझ्या मम्मीचा मतदारसंघ म्हणत...'; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर जहरी टीका

यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांनी आपची मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधला आहे. देशात आपची वाढती लोकप्रियता त्यांच्यासाठी चिंतेचा विषय झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन झाडू सुरू केले आहे. स्वतः मोदी यांनी ही बाब त्यांना भेटायला गेलेल्या लोकांना सांगितली आहे. आपची लोकप्रियता वेगाने वाढत असल्याने ते घाबरले आहेत. भविष्यात भाजपला आव्हान निर्माण करण्यासाठी आपला संपविण्याचा डाव पंतप्रधान मोदी यांनी आखल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीने कोर्टात दिलेल्या जवाबामध्ये निवडणुकीनंतर आपचे खाते गोठविले जाणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आपचे कार्यालय सुद्धा काढून आपला रस्त्यावर आणण्याचा इरादा पंतप्रधान मोदींचा आहे.


दिल्लीतील एक आम आदमी जे स्वप्न पाहत होता, त्या स्वप्नांची पूर्तता केजरीवाल सरकार करीत असल्याने पंतप्रधान मोदी दुखावले आहेत. त्यांचे केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी कोणतेही कार्य करू शकले नाही. लोकांना मोफत वीज, पाणी, महिलांना मोफत बस प्रवास, मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार या योजना जनतेच्या पंसतीस उतरल्या आहेत. या योजना बंद करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांनी आखल्याचा आरोपही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.