Crime News : आश्वासन देऊनही तिकीट मिळालं नाही? आप नेत्याची गळफास लावून आत्महत्या

याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अन्वये चौकशी सुरू केली आहे.
Aap leader Sandeep Bhardwaj
Aap leader Sandeep Bhardwajesakal
Updated on
Summary

याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अन्वये चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) व्यापार शाखेचे राज्य सचिव संदीप भारद्वाज (Sandeep Bhardwaj) यांनी गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी (CRPC) कलम 174 अन्वये चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून सुसाईड नोटही सापडलेली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संदीप भारद्वाज दोन दिवसांपासून घराबाहेरच पडले नव्हते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भारद्वाज हे आप ट्रेड विंग दिल्लीचे सचिव होते आणि राजौरी गार्डनमधील भारद्वाज मार्बल्सचे मालक होते.

Aap leader Sandeep Bhardwaj
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे की..; असं का म्हणाले शंभूराज देसाई?

पश्चिम जिल्ह्याचे डीसीपी घनश्याम बन्सल म्हणाले, गुरुवारी संध्याकाळी 4.40 च्या सुमारास पोलिसांना संदीप भारद्वाज यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. नातेवाइकांनी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सांगितलं की, संदीप जेवण करून वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत गेला होता. बराच वेळ होऊनही तो खाली न आल्यामुळं त्याला भेटायला गेलं असता, संदीप खोलीतील पंख्याला लटकलेला आढळला. नातेवाइकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Aap leader Sandeep Bhardwaj
मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

संदीप भारद्वाज यांच्या एका मित्रानं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, 'एक कारण हे देखील असू शकतं की, तो बराच काळ निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून ते त्यांच्याशी संबंधित होता. येथील आमदार शिवचरणी काम पाहत असतं. त्यांना आश्वासन दिलं होतं, पण तिकीट मिळालं नाही. कदाचित, त्यामुळंच त्यानं आत्महत्या केली असावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.