Adipurush : हिंदु धर्म अन् देवतांचा अपमान करणाऱ्या 'आदिपुरुष'मागे शिंदे-फडणीस? आप नेत्याचे गंभीर आरोप!

adipurush dialogue controversy
adipurush dialogue controversyesakal
Updated on

प्रभास स्टारर आदिपुरुष हा नुकताच रिलीज झालेला चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील संवादावरून सध्या देशात नवा वाद पेटल्याचे पाहायाला मिळत आहे.

यादरम्यान आम आदमी पक्षाने देखील या वादात उडी घेतली असून आदिपुरुष चित्रपटाला विरोध केला आहे. आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी या चित्रपटात वापरण्यात आलेल्या डायलॉगवरून अनेक भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागताना दिसत आहे.

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी या चित्रपटामध्ये भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. भाजप जनता पक्षाच्या नेत्यांनी हा चित्रपट तयार करायला लावला. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराजसिंग, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोहरलाल खट्टर हे भाजपचे मुख्यमंत्री आणि बडे नेत सहभागी आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी यावेळी केला आहे.

adipurush dialogue controversy
Adipurush: मुद्दामच तसं लिहिलं.. हनुमानाच्या वादग्रस्त डायलॉगवर लेखकाची सारवासारव..

या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु धर्म, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, माता सीता भगवान बजरंग बली यांचा अपमान केला जात आहे. या चित्रपटात घाणेरड्या भाषेचा वापर करण्यात आला आहे, ज्याचा रामायणाशी काही संबंध नाहीये, असे संजय सिंह म्हणाले.

adipurush dialogue controversy
Adipurush Box Office Collection: सडकून टीका.. तरीही दणकून कमाई! आकडा पाहून डोळे फिरतील..

प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा नवा चित्रपट 'आदिपुरुष' बऱ्याच काळानंतर प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता होती. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडणार अशी आशाही व्यक्त केली जात होती. मात्र चित्रपट रिलीज होता तो त्यामधील डायलॉग्जमुळे वादात सापडताना दिसत आहे. या चित्रपटात काही डायलॉग्जवर आक्षेप घेतला जात आहे. यामध्य सामान्य दर्शकांसोबतच राजकीय पक्षांकडून देखील अक्षेप घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.