Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Swati Maliwal Rajya Sabha Membership: राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे.
Swati Maliwal Rajya Sabha Membership
Swati Maliwal Rajya Sabha MembershipEsakal
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सध्या अनेक वाईट गोष्टीमधून जात आहे, सध्या आपचे दोन मंत्री तुरुंगात आहेत, तर ते स्वतः आणि संजय सिंह नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्याचवेळी पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांना अनेकवेळा लाथा मारल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण वादात आम आदमी पार्टी बिभव कुमार यांच्या बाजूने उभी आहे. अशा स्थितीत स्वाती मालीवाल यांचे राज्यसभा सदस्यत्व गमवावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
Arvind Kejriwal News : केजरीवालांना ठार मारण्याची धमकी! मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरून 'आप' नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

स्वाती मालीवाल यांना राज्यसभा सदस्यत्व गमवावे लागणार?

या संपुर्ण प्रकरणात स्वाती मालीवाल यांचे राज्यसभा सदस्यत्व गमवावे लागणार नाही. स्वाती मालीवाल यांच्या या प्रकरणाचा त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वावर परिणाम होणार नाही.

भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीच्या नियमांनुसार, खासदाराला केवळ दोनच परिस्थितीत अपात्र ठरवले जाऊ शकते. पहिली परिस्थिती म्हणजे खासदाराने स्वेच्छेने राजीनामा दिला तर किंवा एखाद्या खासदाराने पक्षाच्या सूचनेविरुद्ध मतदान केले किंवा मतांच्या विभाजनादरम्यान (मतदान) अनुपस्थित राहिल्यास त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते.

नियम काय म्हणतो?

याचा अर्थ आम आदमी पक्षाने मालीवाल यांना पक्षातून निलंबित केले तरी त्या पक्षाच्या खासदार राहतील. सभागृहात मतदान करताना त्यांना आपच्या सूचनांचे पालन करावे लागणार असले, तरी आम आदमी पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यास त्या स्वतःच्या राज्यसभेच्या स्वतंत्र खासदार होतील. तज्ज्ञांच्या मते त्या कोणत्याही पक्षाच्या सूचनेला बांधील राहणार नाहीत.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीला ‘पक्षांतरविरोधी कायदा’ असे म्हटले जाते. ते 1985 मध्ये 52 व्या घटनादुरुस्तीद्वारे आणले गेले आहे. या अंतर्गत खासदारांच्या अपात्रतेशी संबंधित सर्व बाबी येतात. मात्र, आम आदमी पक्ष आपल्या खासदाराला निलंबित करेल की त्यांच्यावर कारवाई करेल, असे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत.

स्वाती मालीवाल या राज्यसभा सभागृहात केजरीवाल यांच्या पक्षाच्या सर्वात नवीन खासदार आहेत. त्यांनी या वर्षी जानेवारीमध्ये खासदार म्हणून शपथ घेतली होती, परंतु जर आप आणि मालिवाल यांच्यातील संबंध बिघडले आणि परिणामी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले, तर मालिवाल त्यांच्या उर्वरित कार्यकाळात इतर कोणत्याही पक्षात सामील होऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) राज्यसभा सदस्य रिताबराज बॅनर्जी यांची अलीकडेच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, परंतु ते अपक्ष खासदार राहिले आहेत.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
ISIS Terrorist Arrest: गुजरात ATSची मोठी कारवाई; ISISच्या चार दहशतवाद्यांना अटक

काय आहे स्वाती मालीवाल-बिभव कुमार यांच्यातील वाद?

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मतदान करण्यापूर्वी मालीवाल एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या माजी प्रमुखांनी केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर गुरुवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

आपल्यावरील कथित हल्ल्याबाबत एफआयआरमध्ये, मालीवाल यांनी असाही दावा केला आहे की, कुमार यांनी आपल्याला वारंवार मारहाण केली, परंतु कोणीही त्याच्या बचावासाठी आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.