AAP News : ठाकरेंची सांत्वना करणाऱ्या केजरीवालांच्या 'आप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात?

AAP national party status
AAP national party status
Updated on

नवी दिल्ली : पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यात सत्तेत असलेल्या आप(AAP) ची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता धोक्यात येण्याची शक्यता आहे. आपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाच्या पुनरावलोकनाखाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. मागील वर्षी आम आदमी पक्षाला राष्टीय पक्षाचा दर्जा मिळाला होता.

अवध्या १० वर्षांच्या कारकिर्दित अरवींद केजरीवाल यांच्या आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यत मिळाली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमवलेल्या उद्धव ठाकरे यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत मातोश्री या ठिकाणी येऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून आपच्या राष्ट्रीय पक्ष दर्जाचे पुनरावलोकन केलं जातं आहे. त्यामुळे आप पक्ष त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावण्याची शक्यता आहे.

AAP national party status
Girish Bapat Passed Away : भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत?

आम आदमी पार्टी हा देशातील ८वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात ७ राष्ट्रीय पक्ष होते, ज्यात काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती. देशात राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त राज्यस्तरीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवरील पक्ष आहेत.

AAP national party status
Pune News : ससूनच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला डॉक्टरने मारली उडी; प्रकाराने खळबळ

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो

कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे एखाद्या पक्षाचे लोकसभेत ४ सदस्य असतील आणि लोकसभा निवडणुकीत त्याला ६ टक्के मते मिळाली तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दुसरीकडे, दुसरा मार्ग म्हणजे ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो

AAP national party status
NCP News : राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठा दिलासा! निलंबीत नेत्याची खासदारकी पुन्हा बहाल

आम आदमी पक्षाला कुठे किती मते मिळाली?

राष्ट्रीय पक्ष बनलेल्या आपचे दिल्ली, पंजाब आणि दिल्ली एमसीडीमध्ये सरकार आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचेही गोव्यात दोन आमदार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ने दोन जागा जिंकल्या आणि त्यांना 6.77 टक्के मते मिळाली. आता गुजरातमध्येही आम आदमी पक्षाला जवळपास १३ टक्के मते मिळाली होती. अशाप्रकारे, चार राज्यांमध्ये तो ६ टक्क्यांहून अधिक झाला आहे आणि तो ८वा राष्ट्रीय पक्ष बनला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.