नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधासभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आपने दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही यशाची मोठी मोहोर उमटवली आहे. या यशानंतर आम आदमी पक्षाचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला असून, आपची वाटचाल प्रादेशिक पक्षाकडून राष्ट्रीय पक्षाकडे होताना दिसून येत आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाबमधील घवघवीत यशानंतर आता आप आता दक्षिण भारतात मोठी सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे, अशी माहिती आपचे वरिष्ठ नेते सोमनाथ भारती यांनी दिली आहे. भारती म्हणाले की, पक्षाने दक्षिणेकडील राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी तेलंगणातून याची सुरुवात होणार आहे.
भारती म्हणाले की, त्यांचा पक्ष तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे. पंजाबमध्ये 'आप'च्या दणदणीत विजयानंतर दक्षिण भारतातील लोकांनी पक्षाबद्दल आस्था दाखवायला सुरुवात केली आहे असेदेखील भारती यांनी सांगितले. नागरिकांचा मूड आणि आमच्या टीमला दक्षिण भारतात मिळत असलेला पाठिंबा पाहता आम्ही संपूर्ण प्रदेशात सदस्यत्व मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम पक्षाच्या स्थानिक घटकांकडून चालवली जाईल, असे भारती यांनी सांगितले.

आपतर्फे राबवण्यात येणारे सदस्य नोंदणी मोहिम तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सक्रियपणे सुरू करण्यात येणार असून, ज्यांना भारताच्या राजकारणात बदल घडवून आणण्याची गरज आहे असे वाटते त्या सर्वांना आपमध्ये सहभागी होवून आणि क्रांतीचा एक भाग होण्यासाठी आवाहन भारती यांनी यावेळी केले.
कर्नाटक, तेलंगणामध्ये पत्कारावी लागली हार
आपने कर्नाटक आणि तेलंगणामध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या, पण त्यात त्यांना खाते उघडता आले नव्हते. मात्र, नुकत्याच पंजाबमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आपला आत दक्षिण भारतात नव्याने प्रवेश करायचा विश्वास निर्माण झाला असून, यात पक्ष कितपत यशस्वी होतो हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.