युतीचा पूल बांधणे गडकरींना शक्य : अब्दुल सत्तार

सत्तार यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्ग तसेच आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाबाबत गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.
abdul sattar
abdul sattarsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच महाराष्ट्रात भाजप व शिवसेना (BJP And Shivsena) यांच्यात युतीचा पूल पुन्हा बांधू शकतात व दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची ‘चावी’ ही गडकरींकडे आहे.’’ असे विधान राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज दिल्लीत केले.

सत्तार यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्ग तसेच आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाबाबत गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या पडद्याआडून सूत्रे सांभाळतात असे विधानही त्यांनी केले.

abdul sattar
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

सत्तार यांनी सांगितले की,

‘‘प्रमोद महाजन यांच्यानंतर शिवसेनेशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले नितीन गडकरी हेच केंद्रातील वजनदार नेते आहेत. ते राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचे व ‘मातोश्री’चे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ‘मातोश्री’वर त्यांचे वजनही आहे. त्यांनी मनावर घेतले तर शिवसेना-भाजप युतीबाबत ते पुढाकार घेऊ शकतात. नितीन गडकरी किंवा अमित शहा यांनी जर शिवसेनेला पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केले तर हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात.’’

नंतर मात्र सारवासारव

सत्तार यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘‘ राज्याच्या सत्तेबाबत धोरणात्मक निर्णय फक्त मुख्यमंत्री ठाकरे हेच घेतील. आपल्याला त्याबाबतचा अधिकार नाही.’’ असेही ते म्हणाले. गडकरी हे राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ते राज्याचे व देशाचे वजनदार नेते आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशीही त्यांचे अतिशय उत्तम संबंध आहेत. युतीत दोघांनीही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यामुळे गडकरी यांनी मनावर घेतले तर ते शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी यासाठी पुढाकार घेऊ शकतात असे आपल्याला म्हणायचे होते असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.