Indian Railway: रेल्वे कर्मचाऱ्यांवर ताण! 2.74 लाख पदे रिक्त, कधी होणार या पदांवर भरती?

आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना, भारतीय रेल्वेने सांगितले आहे की जून 2023 पर्यंत रेल्वेमध्ये 2.74 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत
Indian Railway
Indian RailwaySakal
Updated on

Indian Railway: आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना, भारतीय रेल्वेने सांगितले आहे की जून 2023 पर्यंत रेल्वेमध्ये 2.74 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, त्यापैकी 1.7 लाखांहून अधिक केवळ सुरक्षा श्रेणीतील आहेत. असे भारतीय रेल्वेने आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील माहिती अधिकार (आरटीआय) कायदा कार्यकर्ते चंद्र शेखर गौर यांनी दाखल केलेल्या प्रश्नांच्या उत्तरात, रेल्वेने सांगितले की गट क श्रेणीमध्ये 2,74,580 पदे रिक्त आहेत. यामध्ये सुरक्षा श्रेणीतील 1,77,924 रिक्त पदांचा समावेश

डिसेंबर 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती दिली की रेल्वेमध्ये 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत.

सुरक्षेच्या श्रेणीशी संबंधित कर्मचारी थेट ट्रेनच्या ऑपरेशनमध्ये गुंतलेले असतात. यामध्ये लोको पायलट, ट्रॅकपर्सन, पॉइंट्समन, इलेक्ट्रिकल वर्क्स, सिग्नल आणि टेलिकॉम सहाय्यक, अभियंते, तंत्रज्ञ, लिपिक, गार्ड/ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर आणि तिकीट संग्राहक यांसारख्या प्रमुख पदांचा समावेश आहे.

Indian Railway
RK Arora Arrest: ईडीची मोठी कारवाई, सुपरटेकचे अध्यक्ष आर. के अरोरा यांना केली अटक; काय आहे प्रकरण?

महत्त्वाच्या पदांवर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा रेल्वे संघटनांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. खरेतर, रेल्वे युनियनने मंत्रालयाला ट्रॅक मेंटेनन्स, फिटनेस, वरिष्ठ आणि कनिष्ठ विभाग अभियंता आणि तंत्रज्ञ या पदांसाठी पदभरतीसाठी विनंती केली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कमतरते बद्दल सांगितले की, ''कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडतो आणि ट्रॅकची तपासणी करण्यासाठी दररोज आठ ते 10 किमी अंतर कापावे लागते.

हे एक संवेदनशील काम आहे ज्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी इतके अंतर पार करणे कठीण आहे,"

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''ऑक्टोबर 2023 पर्यंत 1.52 लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या रेल्वेने आधीच 1.38 लाख उमेदवारांना नियुक्तीची पत्रे दिली आहेत. त्यापैकी 90 हजार जण सामील झाले आहेत. यातील 90 टक्के पदे सुरक्षा श्रेणीतील असल्याचे त्यांनी सांगितले.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.