ABVP vs Left: मध्यरात्री JNU मध्ये दोन गटात राडा! ABVP अन् डाव्या गटातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; काय आहे प्रकरण?

ABVP Left-backed groups clash at JNU: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठात काल (शुक्रवारी) मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे.
ABVP vs Left
ABVP vs LeftEsakal
Updated on

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठात काल (शुक्रवारी) मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा राडा झाल्याची माहिती आहे.

निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत काही विद्यार्थी देखील जखमी देखील झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या गटामध्ये ही हाणामारी झाली. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये निवडणूक समिती सदस्य निवडीवरून हा मोठा गोंधळ झाला आहे.

जेएनयूमधील भाषा संस्थेत निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीवरून गुरुवारी रात्री दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या वादात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमधील हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीत जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक कथित व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती काही विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करताना दिसत आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे. घटनेच्या आणखी एका कथित व्हिडिओमध्ये काही लोक इतर लोकांशी भांडताना दिसत आहेत आणि विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी केल्या आहेत. या घटनेवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तक्रारींची चौकशी करत आहोत. तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

ABVP vs Left
Himachal Pradesh : 'हिमाचल'वरचं संकट टळलं नाही? कॅबिनेट बैठक अर्ध्यावर सोडून मंत्री गायब; अपात्र आमदारांची घेतली भेट

गेल्या महिन्यातही हाणामारी झाली होती

जेएनयूमध्ये विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारीलाही जेएनयू कॅम्पमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत अभाविप आणि डाव्या गटात संघर्ष झाला होता. ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी दावा केला आहे की, त्यांचे काही सदस्य जखमी झाले आहेत. या भांडणासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले होते.

जेएनयूमध्ये 2024 च्या जेएनयू विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवड करण्यासाठी साबरमती धाब्यावर युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग (UGBM) बोलावण्यात आली होती, जेव्हा विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. ABVP सदस्यांनी मंचावर चढून कौन्सिल सदस्य आणि वक्त्यांना मारहाण केल्याचा आरोप डाव्या-संलग्न डीएसएफने केला. या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन्ही गटांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये एबीव्हीपी आणि जेएनयूएसयू सदस्य घोषणाबाजी करताना दिसले.

ABVP vs Left
Temple Construction: मंदिरं उभारणं हा सार्वजनिक जमिनी बळकावण्याचा दुसरा मार्ग - हायकोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.