Accident News: वेळ ठरली चुकीची! जीवन संपवणाऱ्या मित्राला वाचवायला गेला अन्...; दोघांचाही दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Accident News: ओरिसातील बालासोर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यातील एकाने दुसऱ्याला रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

सोमवारी ओरिसातील बालासोर जिल्ह्यात एका तरूणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून मित्राचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र. यामध्ये वाचवायला गेलेल्या तरूणासह त्याच्या मित्राचा देखील मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेस गाडीची धडक बसल्याने दोन्ही तरुणांनी आपला जीव गमावला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरूणाने आत्महत्या करण्यासाठी ट्रेनसमोर उडी मारली होती. दुसऱ्या त्याच्या एका मित्राने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही या अपघातात जीव गमवावा लागला.

Accident News
Rahul Gandhi: "राहुल गांधींना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी होती", भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

सरकारी रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) सांगितले की, राकेश कुमार पाधी आणि त्याचा मित्र हेमंत साहू सोमवारी रात्री दंडहारीपूर रेल्वे क्रॉसिंगवर पोहोचले जेव्हा पुरी हावडा एक्सप्रेस जात होती. रेल्वेचे गेटकीपर निरंजन बेहरा यांनी सांगितले की, एक्स्प्रेस ट्रेन क्रॉसिंगच्या काही वेळापूर्वी मागे बसलेला एक तरुण खाली उतरला आणि रेल्वे रुळाच्या दिशेने पळू लागला.

Accident News
Video: अशा खोटारड्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे; 'हिंसक हिंदू' वक्तव्याप्रकरणी शंकराचार्यांचे राहुल गांधींना समर्थन

"जेव्हा इतर तरुण त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे धावले, तेव्हा ते दोघेही एक्स्प्रेस ट्रेनने आले त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह किमान 100 मीटरपर्यंत ओढले गेले," अशी माहिती रेल्वे गेटकीपरने दिली. तो पुढे म्हणाला, "त्यांच्यापैकी एक जण ट्रेनसमोर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला."

Accident News
Hathras Case: SITच्या अहवालात भोले बाबाला क्लीन चिट? आयोजन समिती अन् प्रशासनावर उपस्थित केले प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.