Accident In River Ganga : बोटीत सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू

पोलिसांनी जळालेले मृतदेह ताब्यात घेतले
River Ganges Accident News
River Ganges Accident NewsRiver Ganges Accident News
Updated on

Cylinder Explosion In Bihar पाटणा : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मणेर येथे शनिवारी (ता. ६) एक भीषण अपघात झाला. सोन नदीत बोटीवर अन्न शिजवत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder Explosion) होऊन चार जणांचा मृत्यू (Died) झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. बोटीवरील सर्व लोक मजूर होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी जळालेले मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात भोजपूर आणि पाटणा जिल्ह्यांच्या सीमेवर झाला आहे. बिंदगाव गावासमोरील रामपूर वाळू घाटाजवळ सोन नदीत काही लोक नावेत अन्न शिजवत होते. त्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder Explosion) झाला. एका झटक्यात बोटीवरील सर्व जण गंभीररीत्या भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू (Died) झाला.

River Ganges Accident News
Airbag Policy : एअर बॅगची किंमत किती? कार मालकांना नितीन गडकरींचे उत्तर

बोटीवरील सर्व लोक पाटणा जिल्ह्यातील हल्दी छपरा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ते कोइलवार-बिहटा परिसरातून वाळू मजुरी करून बोटीवर अन्न शिजवत होते. पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे. बोटीत सुमारे २० लोक होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू केले आहे.

बोटीतून (Boat) अवैध वाळू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांसाठी बोटीवरच दुपारचे जेवण तयार केले जात असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला आणि नदीच्या मध्यभागी चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या मणेर पोलिस ठाण्याच्या अध्यक्षांनी चार जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

River Ganges Accident News
मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले...

या घटनेत अनेक बोटस्वार जखमी झाल्याचे वृत्त आहे. बचाव पथकाने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जखमींचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. यापूर्वी २४ जुलै रोजी छपरा जिल्ह्यातील खोदाईबाग गावात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, हे विशेष...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.