Belgaum : ..अखेर महाराष्ट्र एकीकरण समितीनं जिंकली कोर्टाची लढाई; 'या' प्रकरणातून आठ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका

येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य फलक जुलै २०१४ मध्ये हटविण्यात आला. त्याला विरोध व आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला.
Maharashtra Ekikaran Samiti Belgaum
Maharashtra Ekikaran Samiti Belgaumesakal
Updated on

बेळगाव : उचगाव येथील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) आठ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयामध्ये (ता. १) झाली. जुलै २०१४ मध्ये हे प्रकरण घडले होते.

Maharashtra Ekikaran Samiti Belgaum
Belgaum Municipal : विरोधी गटनेतेपदासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याचं नाव चर्चेत; पाठिंब्याचं पत्र महापौरांकडं करणार सादर!

याबाबत माहिती अशी की, उचगाव ग्रामपंचायत सचिव सद्याप्पा बसाप्पा तारेकर यांनी २८ जुलै २०१४ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिस (Kakati Police) ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण अप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, अनंत शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपती शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम आणि राजेंद्र वसंत देसाई अशी त्यांची नावे आहेत.

Maharashtra Ekikaran Samiti Belgaum
Sangli News : डाॅ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करा; बेडग ग्रामस्थांसह दलित समाज आक्रमक

येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य फलक जुलै २०१४ मध्ये हटविण्यात आला. त्याला विरोध व आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. निष्पापांना बेदम मारहाण केली. त्यासाठी बेळगावसह सीमाभागात त्याचे पडसाद उमटले. उचगावला ‘महाराष्ट्र राज्य उचगाव’ असा फलक उचगाव बसथांब्याजवळ उभारला.

यामुळे कन्नड व मराठी भाषिकांमध्ये वाद आणि तेढ निर्माणचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. पोलिस अधिकारी आर. टी. लखमगौडर यांनी घटनेचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

Maharashtra Ekikaran Samiti Belgaum
Gokul Milk Politics : हिंमत असेल तर सतेज पाटलांनी एका व्यासपीठावर समोरासमोर यावं; काँग्रेस आमदाराला कोणी दिलंय आव्हान?

चौथ्या जेएमएफसी न्यायालयात साक्ष झाली. यात म. ए. समिती कार्यकर्त्यावरील गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यासाठी सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांतर्फे ॲड. महेश बिर्जे, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर आणि ॲड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.