रामायणातला 'राम' आता भाजपचा; विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष प्रवेश

arun govil
arun govil
Updated on

नवी दिल्ली - रामायण या लोकप्रिय अशा टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. अरुण गोविल यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते बंगालमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत. अरुण गोविल बंगामध्ये जवळपास 100 हून अधिक प्रचारसभा घेतील असं सांगितलं जात आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यालयात त्यांनी पक्ष प्रवेश केला. अरुण गोविल यांनी भाजप प्रवेश करण्याआधी ट्विटरवर म्हटलं की, अनेक मोठ्या चुकांच्या तळाशी अहंकार हेच मूळ कारण असतं. अरुण गोविल हे त्यांच्या रामायणातील प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले आहेत. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

रामायणामुळं पोहोचले घराघरांत
मूळचे मेरठचे असलेल्या अरुण गोविंद यांचा जन्म 1958मध्ये झाला होता. अरुण गोविंद हे एकेकाळी दूर दर्शनवरच्या मालिकांमुळं घराघरात पोहोचलेलं व्यक्तीमत्व आहे. रामायणातील रामाच्या भूमिकेनं त्यांनी लोकप्रियतेची उंची गाठली. त्याकाळात त्यांची लोकप्रियता इतकी होती की, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये लोक त्यांना राम म्हणून साष्टांग नमस्कार करायचे. लोक टीव्हीसमोर पूजा करायचे. त्याचबरोबर रामनंद सागर यांच्याच विक्रम वेताळ मालिकेत त्यांनी राजा विक्रमाची भूमिका केली होती. रामायण 1986मध्ये टीव्हीवर आलेली मालिका होती. त्यानंतर लव कूश मालिकेतही त्यांनी रामाचीच भूमिका केली. 1996-97मध्ये दूरदर्शनवरील बुद्धा या मालिकेत त्यांनी गौतम बुद्धाची प्रमुख भूमिका केली होती. गेल्या काही वर्षांत झी, स्टार प्लस, सोनी टीव्हीवरील मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितलं की, प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधलं जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.