Mohanlal Aid Waynad: अभिनेते मोहनलाल यांची वायनाडच्या पुनर्वसनासाठी ३ कोटींची मदत; घटनास्थळी जाऊन केली प्रत्यक्ष पाहाणी

Mohanlal Aid Waynad: वायनाडी दुर्घटना ही भारतातील आजवरची सर्वात मोठी शोकांतिक घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Mohanlal Aid to Waynad
Mohanlal Aid to Waynad
Updated on

वायनाड (केरळ) : केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. साऊथ इंडस्ट्रीतले प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांनी चूरलमाला आणि मुंडक्काई गावातील बाधित स्थळांना भेट दिली. तसंच घटनास्थळावरील मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या लष्कराच्या जवानांशी संवादही साधला. यानंतर यातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी ३ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

विश्वसंती फाऊंडेशनच्या माध्यमातून मोहनलाल वायनडमधील पीडितांना ही मदत करणार आहेत. घटनास्थळी भेट दिल्यांनतर मुंडक्काई भागात पत्रकारांशी बोलताना मोहनलाल यांनी सांगितलं की, "विश्वशांती फाउंडेशनच्या माध्यमातून पुनर्वसनासाठी आम्ही सुरुवातीच्या टप्प्यावर 3 कोटी रुपयांची घोषणा करत आहोत. पुनर्वसन प्रकल्पासाठी आम्ही आता 3 कोटी रुपयांचे योगदान देत आहोत आणि गरज पडेल तसे आणखी सहकार्य करु," विश्वसंती फाउंडेशन ही मोहनलाल यांनी 2015 मध्ये त्यांचे आई-वडील विश्वनाथन आणि संथाकुमारी यांच्या नावाने स्थापन केलेली ना-नफा संस्था आहे.

Mohanlal Aid to Waynad
Bomb Threat by Student: विद्यार्थ्यानंचं दिली शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी! दिल्लीतला धक्कादायक प्रकार; कारण ऐकून...

भारतातील आजवरची सर्वात मोठी शोकांतिका

"वर जाऊन पाहिल्यावर या घटनेची भीषणता आम्हाला कळली. इथं खूप चिखल आहे आणि अजूनही लोक आत अडकलेले आहेत की नाही याची खात्री नाही. या बचाव कार्यात काम करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. भारताने आजवर पाहिलेली सर्वात मोठी शोकांतिका आहे, आम्ही इथं जे गमावलं आहे ते परत मिळवू शकणार नाही, परंतु आम्ही या लोकांना त्यांच्या भविष्यासाठी कशी मदत करू शकतो याबाबत विचार करणं आवश्यक आहे," असं मोहनलाल यांनी म्हटलं आहे.

अभिनेते मोहनलाल हे इंडियन टेरोटोरिअल आर्मीत लेफ्टनंट कर्नल म्हणून मानद पदावर आहेत. त्यांनी आज सकाळी बाधित स्थळांना भेट दिली तेव्हा त्यांनी लष्कराचा गणवेश परिधान केलेला होता.

Mohanlal Aid to Waynad
Uddhav Thackeray: अहमद शाह ते अमित शाह... वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे

308 जणांचा मृत्यू

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी वायनाड जिल्ह्यातील चूरलमाला आणि मुंडक्काई इथं झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या शुक्रवारपर्यंत 308 वर पोहोचली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये बचाव कार्य अंतिम टप्प्यात असल्यानं आतापर्यंत २१५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 206 लोक अद्याप बेपत्ता आहेत आणि 83 जणांवर वायनाड, कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसंच एकूण 10,042 लोकांना निवारा छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.