दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. पुन्हा एकदा प्रकाश राज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. प्रकाश राज यांनी एकाच नाण्याच्या दोन बाजू असे कॅप्शन देत दोन फोटो शेअर केले आहेत. दरम्यान त्यांच्या या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.