लग्नच नाही, तर घटस्फोट कसला? नुसरतचा खुलासा

आम्ही वेगळे झालो होतो, पण मी या सर्व गोष्टी कोणाला सांगितल्या नाहीत. कारण मला माझे वैयक्तिक आयुष्य माझ्यापुरते मर्यादित ठेवायचे होते.
Nusrat Jahan
Nusrat JahanGoogle file photo
Updated on
Summary

आम्ही वेगळे झालो होतो, पण मी या सर्व गोष्टी कोणाला सांगितल्या नाहीत. कारण मला माझे वैयक्तिक आयुष्य माझ्यापुरते मर्यादित ठेवायचे होते.

कोलकाता : अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 2019 मध्ये नुसरतचे लग्न निखिल जैनसोबत झाले होते. निखिल आणि नुसरतने तुर्कीमध्ये डेस्‍ट‍िनेशन वेड‍िंग केले. नुसरतने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. तुर्कस्थानमधील कायद्यानुसार नुसरत आणि निखिलचे लग्न झाले. भारतीय कायद्यानुसर हे लग्न वैध नाही. या सर्व गोष्टींवर नुसरतने तिची मते मांडली आहेत. (actress nusrat jahan statement wedding ceremony with nikhil jain is invalid)

गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखिलमध्ये मतभेद सुरू होते. निखिलने म्हटले आहे की, ''तो गेल्या 6 महिन्यांपासून नुसरतपासून वेगळा राहत आहे. नुसरत प्रेग्नंट असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. नुसरत जरी प्रेग्नंट असली, तरी ते मूल माझं नाही.'' यासर्व गोष्टींवर नुसरतने तिचे मत मांडले आहे. नुसरत म्हणाली, 'तुर्की मैरेज रेग्युलेशननुसार माझे आणि निखिलचे लग्न अमान्य आहे. त्याचप्रमाणे हे लग्न दोन वेगळ्या धर्मांच्या व्यक्तींमध्ये झाले होते. त्यामुळे भारतामध्ये या लग्नाला वैधानिक मान्यता देणे गरजेचे होते, पण असे झाले नाही. कायद्यानुसार हे लग्न वैध नाही. हे लग्न रिलेशनशिप किंवा लिव- इन रिलेशनशिप म्हणून मानले जात आहे. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. आम्ही वेगळे झालो होतो, पण मी या सर्व गोष्टी कोणाला सांगितल्या नाहीत. कारण मला माझे वैयक्तिक आयुष्य माझ्यापुरते मर्यादित ठेवायचे होते. आमचे कथित लग्न हे कायद्यानुसार वैध नाही. मुळात भारतीय कायद्यानुसार याला लग्नाची मान्यताच नाही.'

Nusrat Jahan
राहुल गांधींचे विश्वासू भाजपमध्ये; काँग्रेसला धक्का

यावर निखिलने म्हटले आहे की, 'नुसरत माझ्यासोबत नाही, तर दुसऱ्या कोणासोबत राहू इच्छिते.' निखिलने याबाबत केस दाखल केली आहे. दरम्यान, अभिनेता यशदास गुप्तासोबत नुसरतचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ते दोघे राजस्थान ट्रिपवर गेले होते, तेव्हापासून ते एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. या प्रकरणी यशदास गुप्ताने बोलणे टाळले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशदास गुप्ता हा भाजप नेता असून नुसरत तृणमूल काँग्रेसची खासदार आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

Nusrat Jahan
शेतकरी आंदोलन: ममता बॅनर्जींना भेटणार राकेश टिकैत; काय असेल पुढची दिशा?

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.