Jeetenge Hum: क्रिकेट वर्ल्डकपसाठी अदानी ग्रुपची मोठी घोषणा; 1983च्या स्टार टीमसह राबवणार खास मोहिम

आयसीसीचा वनडे क्रिकेट वर्ल्डकप ऑगस्ट २०२३ पासून सरु होत आहे.
Jeetenge Hum_Adani Group
Jeetenge Hum_Adani Group
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023 : आयसीसीचा वनडे क्रिकेट वर्ल्डकप ऑगस्ट २०२३ पासून सरु होत आहे. यामध्ये टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी अदानी ग्रुपनं एक खास मोहिम लॉन्च केली आहे. यासाठी त्यांनी १९८३मधील विश्वविजेत्या भारतीय संघालाही सोबत घेतलं आहे. (Adani Group Big Announcement for Cricket World Cup 2023 launch special campaign)

कंपनीच्या माहितीनुसार, भारताच्या १९८३ मधील ऐतिहासिक विजयाच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त अदानी समूह आगामी विश्वचषकात टीम इंडियासाठी खास मोहिम राबवणार आहे. 'जितेंगे हम' नावानं ही मोहिम असून भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकजूट होण्यासाठी आणि ट्विटर, इन्स्टाग्रामवर #JeetengeHum वापरत टीम इंडियाला प्रोत्साहित करणार आहे. यासाठी रॅलीज काढून खेळाडूंचं मनोबल वाढवण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

Jeetenge Hum_Adani Group
Mumabi News: कॉन्स्टेबलच्या धाडसाला सलाम; दोन चिमुकल्यांना समुद्रात बुडण्यापासून वाचवलं!

देशातील अब्जाधीश उद्योपगपती असलेले गौतम अदानी यांनी आज ६१ व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अदानी ग्रुपनं यंदाच्या विश्वचषकासाठी खास मोहिम सुरु केली आहे. याबाबत माहिती देताना गौतम अदानी म्हणाले, "क्रिकेट आपल्या देशातील एक शक्ती आहे, ज्यामध्ये जनतेच्या भावना गुंतल्या आहेत.

क्रिकेटमधील दिग्गज जन्माला येत नाहीत ते लवचिकता आणि चिकाटीनं तयार होतात. टीम इंडियाकडं हे दोन्ही गुण असले पाहिजेत आपल्याला 1983 मध्ये विश्वचषक जिंकता आला. त्यानंतर आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना पाहण्याची आम्हाला आशा आहे. त्यामुळं #JitengeHum या हॅशटॅगच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला आगामी विश्वचषकासाठी शुभेच्छा देण्यासाठी आमच्यासोबत सामील व्हा" (Marathi Tajya Batmya)

Jeetenge Hum_Adani Group
PM Modi Egypt tour: PM मोदी थेट अमेरिकेतून इजिप्तमध्ये दाखल! दोन्ही देशांमधील 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

या मोहिमेच्या उद्घानप्रसंगी बोलताना 1983च्या विजयी संघाचे कर्णधार कपिल देव म्हणाले, "ही मोहीम उत्साहाचे आणि अदम्य भावनेचं प्रतीक आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी टीम इंडियाच्या रॅलीमध्ये अदानी समूहासोबत एकत्र येण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. विश्वचषक 2023 च्या तयारीसाठी, हे अत्यावश्यक आहे"

Jeetenge Hum_Adani Group
Devendra Fadnavis: फडणवीसांनी आता सोज्वळपणा सोडावा - बावनकुळे

1983च्या संघाचे नायक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी यावेळी म्हणाले, “1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग बनणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता. दृढनिश्चय आणि सांघिक भावना आम्हाला एकत्रितपणे चालण्यास भाग पाडलं. आम्हाला सध्याचे खेळाडूकडेही ही ट्रॉफी परत आणण्याची क्षमता आहे, यावर आमचा विश्वास आहे. टीम इंडियाचे चाहते म्हणून एकत्र येऊन या खेळाडूंनी इतिहास रचण्यासाठी प्रेरित करूया"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.