Adani Group: इस्रायलच्या 'या' बंदरासाठी अदानींनी का लावली इतकी मोठी बोली?

किंमत ऐकून बाकी कंपन्यांनी घेतली माघार
adani group
adani groupesakal
Updated on

अदानी समूहाच्या एका कंपनीने इस्रायलचे दुसरे सर्वात मोठे बंदर हैफा विकत घेतले आहे. हा करार $1.18 अरब डॉलरमध्ये झाला आहे. अदानी ग्रुपच्या कंपनीने गॅडोट ग्रुप या स्थानिक इस्रायली कंपनीच्या सहकार्याने विकत घेण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. (Adani Group)

अदानी समूहाने गेल्या आठवड्यात इस्रायलमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेले हैफा बंदर ताब्यात घेतले. हे बंदर $1.18 अब्ज रुपयांना विकत घेतले गेले. आता इस्रायली मीडिया या कराराला धोरणात्मक चाल म्हणत आहे.

इस्रायली वृत्तपत्र डेली हारेट्झ (daily Ha'aretz)ने वृत्त दिले आहे की, हैफा बंदर लिलाव प्रक्रियेतील भारतीय कंपनी अदानी आणि तिची सर्वात जवळची स्पर्धक यांच्यातील बोलीच्या किंमतीतील फरक दर्शविते. बोली लावताना अदानी समूहाने पैशांचा विचार केला नाही असेही मीडियाकडून सांगण्यात आले आहे.

adani group
Gautam Adani : बिल गेट्स यांना मागं टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथे 'श्रीमंत'

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांनी संयुक्तपणे इस्रायलच्या गॅडोट ग्रुपने हैफा बंदराच्या खाजगीकरणासाठीची निविदा जिंकली आहे.

हायफा बंदर हे इस्रायलचे दुसरे सर्वात मोठे बंदर आहे.या बंदराच्या मालकी हक्कांमध्ये अदानी कंपनीचा 70 टक्के हिस्सा असेल तर गॅडोट ग्रुपचा 30 टक्के हिस्सा असेल.

अदानी पोर्ट्सने बंदरासाठी 3.1 अब्ज शेकेल ($1.18 अब्ज डॉलर) देऊ केले होते, असे अहवालात म्हटले आहे. इस्त्रायली सरकारच्या अपेक्षेपेक्षा ही किंमत जास्त आहे. या बोलीकडे बघितल्यावर असे दिसते की, अदानी म्हणत आहेत, दूर व्हा, हा एक धोरणात्मक करार आहे आणि आमच्यासाठी या किमतीला फारसे महत्त्व नाही.

adani group
5G स्पेक्ट्रमसाठी चौथा अर्ज अदाणींचाच; अधिकृत यादी जाहीर

स्थानिक गटांना देखील बंदर खरेदी करण्याच्या बोलीमध्ये भाग घ्यायचा होता, परंतु जेव्हा त्यांना अदानी पोर्ट्सने देऊ केलेल्या पैशाबद्दल ऐकले तेव्हा त्यांनी माघार घेतली, असे अहवालात म्हटले आहे.

ही बोली अशा वेळी घेण्यात आली जेव्हा आई2यू2 (I2U2) संघटनेच्या सदस्य देशांचे भारत, इस्रायल, अमेरिका आणि UAE यांच्या नेत्यांची व्हर्च्युअल परिषद सुरू होती.

आई2यू2 (I2U2)कडे नवीन क्वाड संस्था म्हणून पाहिले जात आहे, ज्याचा उद्देश चीनचा वाढता प्रभाव कमी करणे आहे.

अदानी समूहाची कंपनी आणि इस्रायली कंपनी गॅडोट केमिकल टर्मिनल्सला हैफा बंदर बोलीचे विजेते घोषित करण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. ही कंपनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक गौतम अदानी यांची आहे.

adani group
…तर गौतम अदानी बारामतीकरांना मदत करतील- अजित पवार

अदानीची कंपनी भारतात 13 सागरी टर्मिनल चालवते. अहवालात म्हटले आहे की, अदानी समूहाची पाश्चात्य देशांमध्ये कोणतीही होल्डिंग नाही, त्यामुळे कंपनीचा इस्रायलमधील प्रवेश आशिया आणि युरोपमधील सागरी वाहतूक वाढण्याचे चिन्ह म्हणून पाहिले जात आहे.

अदानी यांनी गुरुवारी ट्विट करून सांगितले की, हैफा बंदर त्यांच्या इस्रायली भागीदार कंपनी गॅडोटच्या सहकार्याने विकत घेतली आहे.

त्याचवेळी, इस्त्रायलला वाटते की, अदानींनी देशात प्रवेश केल्यानंतर, भविष्यात भारताकडून इस्त्रायमध्ये आणखी गुंतवणूक होईल. जास्तीत जास्त अक्षय ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढेल.

भारतात ड्रोन उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी अदानी समूह याआधीच आघाडीच्या इस्रायली संरक्षण कंपन्यांशी हातमिळवणी करत आहे.

adani group
समाजकार्यासाठी 60 हजार कोटी रुपये देणार, गौतम अदाणींची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.