नवी दिल्ली : कोरोना महासाथीमुळे संपूर्ण मानवी जगताचंच आयुष्य बदलून गेलंय. साधारण दोन वर्षांपासून या विषाणूचा गोंधळ सुरु असून कधी ही महासाथ संपणार असा सवाल सातत्याने विचारला जातो. याबाबत आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख (Serum Institute of India - SII) अदर पुनावाला यांनी उत्तर दिलंय. कोविशील्ड या लशीचे निर्माते अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ही कोरोनाची महासाथ कशी संपू शकते, याबाबत एक ठाम उत्तर दिलंय.
अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, कोरोनाची ही महासाथ संपूर्पपणे संपवण्यासाठी कोट्यवधी लोकांचे जलद गतीने लसीकरण करणे आवश्यक आहे. काल मंगळवारी त्यांनी हे विधान केलंय. त्यांनी पुढे म्हटलंय की, कोरोना लसीच्या पुरवठ्यातील अडचणी सध्या उरलेल्या नाहीयेत. आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने यावर्षी काम करत आहोत. त्यामुळे पुरवठा होत नाहीये, अशी तक्रार सध्या नाहीये.
लस चाचण्यांसाठी एक सुस्पष्ट मानक हवं तसेच लस मंजूरी आणि वितरणासाठी सुसंगत फ्रेमवर्क स्थापन करण्याचंही त्यांनी आवाहन केलंय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने मंगळवारी आयोजित केलेल्या ‘मीटिंग द चॅलेंज ऑफ व्हॅक्सिन इक्विटी’ या सत्रात पूनावाला यांनी ही मते मांडली आहेत.
दरम्यान, भारतातील (India) कोरोना (Corona) संसर्गाचा वेग वाढत असून केंद्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचा निर्देश दिले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी अडीच लाख आणि त्याहून जास्त आढळत आहे. गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८२ हजार ९७० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Latest Covid News Updates in India)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.