मंत्रमुग्ध वातावरणात पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास गुजरातमध्ये प्रारंभ; तब्बल 38 वर्षांनी सोनगड नगरीत होत आहे पूजा

आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास (Adinath Digambar Jinbimb Panchkalyan Festival) प्रारंभ झाला.
Panchkalyan Festival Songadh Gujarat
Panchkalyan Festival Songadh Gujaratesakal
Updated on
Summary

श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टच्या वतीने हा महोत्सव व अभिषेक सोहळा होत आहे. 38 वर्षांनी या नगरीत ही पूजा होत होत आहे.

सोनगड (गुजरात) : अखंड मंत्रोच्चाराचा जागर, भक्तीभावात मग्न हजारों श्रावक-श्राविका अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात काल (शुक्रवार) श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास (Adinath Digambar Jinbimb Panchkalyan Festival) प्रारंभ झाला. सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहणाने सुरुवात झालेला सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. सायंकाळच्या सत्रात श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

अयोध्या पुरी (Ayodhyapuri) नावाने उभारण्यात आलेल्या सभा मंडपात सुरू असलेले धार्मिक विधी व बाहेरील प्रांगणामध्ये वैविध्य पूर्ण नटलेले स्टॉल्स, उभारलेल्या कलाकृती अशा मंगलमय वातावरणात पहिल्या दिवसाचे विधी झाले. या पूजा महोत्सवास देशभरातून गर्दी होत आहे. सकाळच्या सत्रात मंगल धर्म ध्वजारोहण, प्रतिष्ठा मंडपाचे उद्घाटन, नंदी विधान कलश, जिनवाणी प्रतिष्ठापना आदी कार्यक्रम झाले.

Panchkalyan Festival Songadh Gujarat
शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

दुपारच्या सत्रात पंचपरमेषठी विधान, इंद्रप्रतिष्ठा, गोत्र परिवर्तन आदी कार्यक्रम झाले. दुपारचे धार्मिक विधी झाल्यानंतर निघालेल्या शोभा यात्रेने उत्साह टिपेला गेला. अनेक चित्ररथामध्ये विराजमान श्रावक श्राविका, भक्तीपूर्ण गाण्यांच्या तालावर जल्लोषात सुरू असणारे नृत्य अशा उत्साहपूर्ण वातावरणाने शोभा यात्रेची रंगत वाढवली. सायंकाळी स्वाध्याय व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टच्या वतीने हा महोत्सव व अभिषेक सोहळा होत आहे. 38 वर्षांनी या नगरीत ही पूजा होत होत आहे. संयोजकांनी नेटकी व्यवस्था केली आहे. भोजनकक्षाचा लाभ हजारो श्रावक श्राविका नियोजन पद्धतीने घेत आहेत. गुजरात बरोबर महाराष्ट्रातील स्वयंसेवक ही या सोहळ्यात सेवा देत आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची नोंद करून त्यांना कापडी रिस्ट बँड देण्यात येत आहेत.

Panchkalyan Festival Songadh Gujarat
ऐतिहासिक दसरा चौकात उभारली प्रभू श्रीरामांची तब्बल 108 फुटी भव्य प्रतिमा; मंत्री पाटील, महाडिकांच्या उपस्थितीत आज अनावरण

आज (शनिवारी) होणारे कार्यक्रम

सकाळी पावणे सातला कार्यक्रमास प्रारंभ होईल. शांती जाप, श्री जिनेंद्रदेव अभिषेक आणि पूजन होईल. या नंतर श्री यज्ञमंडळ विधान होईल. लाइफ आर्ट प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सोधर्म इंद्र सभा, सायंकाळी 56 कुमारिका भक्ती गीत, 16 स्वप्ने प्रदर्शन आदी संस्कृतीक कार्यक्रम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.