Aditya-L1: "भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा"; 'आदित्य L1' इच्छितस्थळी पोहोचताच PM मोदींचं ट्विट

सूर्याच्या अभ्यासाठी आवकाशात झेपावलेलं आदित्य L1 यानं आपल्या इच्छितस्थळी पोहोचलं आहे.
PM Modi
PM Modi
Updated on

नवी दिल्ली : सूर्याच्या अभ्यासाठी आवकाशात झेपावलेलं आदित्य L1 यानं आपल्या इच्छितस्थळी पोहोचलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन जगाला याची माहिती दिली. मोदींनी ट्विटमध्ये भारतीय अंतळराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. (Aditya L1 has reached its destination to Langrez Point 1 PM Modi tweeted and appreciated Isro)

भारतानं गाठला आणखी एक मैलाचा दगड

मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं की, "भारतानं आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताचं पहिलं सूर्यनिरिक्षक यान आदित्य L1 आपल्या मुक्कामस्थळी पोहोचलं. आपल्या वैज्ञानिकांच्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्याच्या अथक समर्पणाचा हा पुरावा आहे. या विलक्षण पराक्रमाच्या कौतुक सोहळ्यात मी देखील देशवासियांसोबत आहे. आम्ही मानवतेच्या हितासाठी अशा वैज्ञानिक मोहिमांचा पाठपुरावा करत राहू" (Latest Marathi News)

PM Modi
One Nation, One Election: 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्वाची अपडेट! रामनाथ कोविंद यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन

मोदींच्या नेतृत्वाखाली गाठलं ध्येय

दरम्यान, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे वर्ष भारतासाठी खूपच भाग्यशाली ठरलं आहे. कारण इस्रोनं आणखी एक यश गाठलं आहे. आदित्य एल१ नं आपलं अंतिम ध्येय गाठलं आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या कनेक्शनमधील गुढ उकलण्यात ते महत्वाची कामगिरी बजावेल. (Marathi Tajya Batmya)

PM Modi
Aditya L1 Mission : 'एल-1' लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला 'आदित्य'; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! पंतप्रधानांनी केली पोस्ट

चार महिन्यांपूर्वी केलं होतं उड्डाण

आदित्य L1 नं २ सप्टेंबर २०२३ रोजी आपला प्रवास सुरु केला होता, तो आज चार महिन्यानंतर पूर्ण झाला. या यानानं आपलं अंतिम ध्येय गाठलं असून पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किमी अंतरावरील L1 पॉईंटपर्यंत ते पोहोचलं आहे. या यानाचा उद्देश सूर्याचा सर्व प्रकारचा अभ्यास करणं हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.