शिवसेनेचे युपीत ३७ उमेदवार रिंगणात; आदित्य ठाकरे करणार प्रचार

Aditya Thackeray will campaign for 37 Shivsena candidates in Uttar Pradesh Assembly elections
Aditya Thackeray will campaign for 37 Shivsena candidates in Uttar Pradesh Assembly elections
Updated on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Election) रणसंग्राम हा शिगेला पोहचला असून, सर्वच राजकीय पक्ष मोठ्या संख्येने प्रचारात गुंतले आहेत. दरम्यान आता शिवसेना (Shivsena) देखील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आता कंबर कसली असून लवकरच ते उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रणधूमाळीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना गोव्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात uttar pradesh assembly election 2022 देखील निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि प्रयागराज येथे सभा घेण्याची शक्यता आहे, दरम्यान या निवडणूकीत शिवसेनेचे ३७ उमेदवार हे रिंगणात असणार आहेत, दरम्यान शिवसेनेच्या ५९ उमेदवारांनी या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरले होते, ज्यापैकी तब्बल २२ अर्ज हे बाद झालेत. यावर शिवसेनेकडून शडयंत्र सुरु असल्याचा आरोप देखील केला गेला होता.

Aditya Thackeray will campaign for 37 Shivsena candidates in Uttar Pradesh Assembly elections
अरे वा! लाँच झाली 100 रुपयांची SIP, मिळेल गुंतवणुकीची उत्तम संधी

या दरम्यान उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत बाबरी राममंदीर या पार्श्वभूमीवर निवडणूक लढताना शिवसेना कोणत्या मुद्दयांवर निवडणूक लढेल ते पाहाणे महत्वाचे ठरणार आहे . तसेच ३७ उमेदवारांपैकी किती विजयी होणार याबद्दल देखील विरोधकांकडून विचारणा केली जात आहे, याआधी देखील शिवसेनेने उत्तर प्रदेशात काही निवडणूका लढवल्या आहेत मात्र पक्षाला म्हणावे तसे यश मिळवता आलेले नाही. पक्षाच्या कामगिरीवरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचलं होतं, त्यामुळे आता यावर्षी शिवसेनेची उत्तर प्रदेशातील कामगीरी कशी राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Aditya Thackeray will campaign for 37 Shivsena candidates in Uttar Pradesh Assembly elections
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.