World Radio Day: 15 ऑगस्ट 1947 चा दिवस. पंतप्रधान नेहरूंनी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याची घोषणा केली. स्वातंत्र्याचा हा शुभसंदेश घराघरात पोहोचवला तो आकाशवाणीनं (Akashvani). अशा कित्येक चांगल्या वाईट घटनांना भारतातील (India) प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम केलं ते आकाशवाणीनं.
देशात एक काळ असा होता जेव्हा लोकांकडे टीव्ही नव्हते, मोबाईल फोन नव्हते, तेव्हा फक्त एक आवाज होता ज्या आवाजावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवायचे. बातम्या, संगीत आणि क्रिकेट समालोचनापासून ते देशाची सत्ता चालवणाऱ्यांपर्यंत सर्व गोष्टी येथे उपलब्ध असायच्या तो म्हणजे आकाशवाणी. अनेक क्रातिकारकांनी छुपे रेडिओ स्टेशन सुरु करुन स्वातंत्र्याची भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. आज एवढ्या प्रगतीनंतर रेडिओ (Radio) आजही भारतीयांची साथ देतोय.
आज जागतिक रेडिओ दिवस. या निमित्ताने आज आपण रेडिओच्या अनेक दशके जुन्या संबंधांचे विश्लेषण करणार आहोत. (HITLER AND ALL INDIA RADIO-AKASHVANI)
भारतात रेडिओची सुरुवात १९२३ मध्ये झाली. तेव्हापासून देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचा रेडिओ साक्षीदार बनला आहे. 11 मे 1947 रोजी महात्मा गांधींचे (Mahatme Gandhi) भाषण देशातील जनतेने रेडिओच्या माध्यमातून ऐकले, 1947 मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची माहितीही रेडिओवरून देशाला मिळाली. देशातील सर्व मोठ्या नेत्यांच्या बातम्या रेडिओनेच लोकांपर्यंत पोहोचवल्या. अगदी आणीबाणीची माहितीही रेडिओवरूनच देशवासीयांनी ऐकली.
पण बदलत्या काळानुसार रेडिओ हळूहळू लोकांपासून दूर गेला. पण 3 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओला जनतेशी जोडून पुन्हा एकदा सुपरहिट केले. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशातील करोडो लोकांना रेडिओशी जोडले.
आज, जागतिक रेडिओ दिनानिमित्त, आम्ही तुमच्यासोबत भारतातील रेडिओच्या प्रवासाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा आज तुम्हाला सांगणार आहोत.
रेडिओमध्ये एक विशिष्ट पद्धतीची धून वाजायची. ही धून ऑल इंडिया रेडिओची सिग्नेचर ट्यून असायची. या धूनने रेडिओवर कार्यक्रम सुरू व्हायचे. हा सूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा मोठा हात आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
1933 मध्ये जर्मनीतील ज्यूंवर हिटलरच्या अत्याचारामुळे वॉल्टर कॉफमन नावाचे संगीतकार भारतात आले. मुंबईत ऑल इंडिया रेडिओवर संगीतकार म्हणून काम करताना त्यांनी ही ऐतिहासिक धून तयार केली.
या सुरात भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा अनोखा मेळ आहे. हिटलरच्या अत्याचाराला कंटाळून वॉल्टर कॉफमन भारतात आला नसता तर भारतात रेडिओची दुसरी धून वाजली असती.
वॉल्टरच्या प्रतिभेचा अंदाज तुम्ही यावरूनही लावू शकता की 1938 मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांना एक महान संगीतकार म्हणून वर्णन करणारे पत्र लिहिले होते. एका महान शास्त्रज्ञाची संगीतकाराबद्दलची ही भावना आजही स्मरणात आहे. भारतात रेडिओचा स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.