Single Parents मूल दत्तक घेऊ शकतात का? काय आहे नियम

मूल दत्तक कोण घेऊ शकतं?
Adoption rule in India
Adoption rule in Indiaesakal
Updated on
Summary

हि दत्तक प्रक्रिया सुलभ केलेली आहेत.

भारतात मूल दत्तक (Adopt) घेण्यासाठी अनेक नियम आणि कायदे (Children adoption rule and regulation) आहेत. हि दत्तक प्रक्रिया सुलभ केलेली आहेत. पण माहितीअभावी चुकीच्या पद्धतीने मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया अवलंबणारे अनेक जण आहेत, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकते. मूल दत्तक घेण्यासाठी 1956 चा हिंदू दत्तक व देखभाल कायदा (Hindu Adoption and mentinance act 1956-HAMA) लागू करण्यात आला. हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समाजातील लोकांमध्ये मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेशी हा कायदा संबंधित आहे. इतर समुदायांसाठी बाल न्याय (केयर अॅंड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन) अॅक्ट 2000 हा जेजे कायदा नावाचा कायदा आहे. जेजे कायद्यापूर्वी गार्डियन अँड वॉर्ड अॅक्ट (GWA) 1980 होता.

Adoption rule in India
मूल दत्तक घेणाऱ्यांसाठी बालविकास विभागाची महत्त्वाची सूचना

2015 मध्ये राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर एजन्सी स्थापन करून नियम अधिक सुलभ करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटीची (Child adoption resource authority) स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे स्टेट ऑप्शन रिसोर्सेस एजन्सी राज्य पातळीवरच राहते. जिल्हास्तरावर जिल्हा बालसंरक्षण विभाग आहे. आता मूल दत्तक घेण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊयात.

मूल दत्तक कोण घेऊ शकतं?

- भारतातील कोणताही नागरिक जो पालक म्हणून, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि त्याला कोणताही जीवघेणा आजार नाही, तो नियंत्रित प्रक्रियेअंतर्गत मूल दत्तक घेऊ शकतो. पण त्यासाठी इतरही अनेक अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे.

- कोणताही पालक, मग तो वैवाहिक स्थितीचा विचार न करता, मग त्याला स्वत:चे मूल असो वा नसो त्या व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा हक्क असतो.

- दत्तक घेणारा पालक विवाहित असेल, तर त्यांची परस्पर संमती असणे आवश्यक आहे. एक सिंगल स्त्री मुलगा किंवा मुलगी दोघांनाही दत्तक घेऊ शकते. पण एक सिंगल पुरुष फक्त मुलगा दत्तक घेऊ शकतो.

- दत्तक घेणाऱ्या भावी पालकांमधील विवाहाला दोन वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे.

- दत्तक घेणाऱ्याच्या वयाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. चार वर्षांपर्यंतचे मूल दत्तक घेणाऱ्या पालकांचे एकूण वय कमाल ९० वर्षे आणि एकटे पालक असलेल्यांचे ४५ वर्षे असे एकूण किंवा संमिश्र वय ठेवले जाते. त्याचप्रमाणे मूल दत्तक घेण्यासाठी ४ ते ८ वर्षांपर्यंतचे एकूण मिश्र वय १०० वर्षे असून मूल दत्तक घेण्यासाठी ५० वर्षे व एकल पालकासाठी ८ ते १८ वर्षे असे कमाल मिश्र वय ११० वर्षे व एकटे असलेल्या पालकासाठी ५५ वर्षे आहे. त्याचबरोबर मूल आणि पालक यांच्यामध्ये किमान वयाचे अंतर २५ वर्षांचे असते.

- तीनपेक्षा अधिक मुले असलेल्या पालकांना मूल दत्तक घेता येत नाही. या परिस्थितीत विशेष परवानगी आवश्यक असेल.

Adoption rule in India
#MokaleVha : लग्न न करता मूल दत्तक घेता येईल का?

दत्तक घेण्याचे नियम-

मूल दत्तक घेण्यासाठी केंद्रीय एजन्सी www.cara.nic.in मध्ये ऑनलाइन पद्धतीने फॉर्म अपलोड करावा लागतो. त्यासाठी आपल्या दस्तऐवजाशी संबंधित सर्व गोष्टी प्रमाणित करणारी विविध प्रकारची कागदपत्रे एकत्र ठेवावी लागतील. उदा., उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड इत्यादी.

सिंगल पुरुषांसाठी नियम-

सिंगल पॅरेंटचा नियम थोडा वेगळा आहे. विशेषत: जर तुम्ही पुरुष असाल तर याचे काही नियम आहेत. त्यासाठी तुम्हाला स्पेशलाइज्ड अॅडॉप्शन एजन्सीकडे अर्ज करावा लागेल. पुरुषाचे किमान वय २५ वर्षे असायला हवे. तसेच, पालकांना बंधनकारक असलेली सर्व पात्रता असायला हवी. अविवाहित पुरुष मुलगी दत्तक घेऊ शकत नाहीत. विशेष दत्तक संस्थेकडे नोंदणी केल्यानंतर ही एजन्सी तुमच्या दाव्याची चौकशी करेल. यालाच होम स्टडी रिपोर्ट म्हणतात. जर तुम्ही घरी एकटे राहत असाल तर तुम्हाला मूल दत्तक मिळणार नाही. म्हणजे तुमची मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थिती कशी आहे, तुम्ही दत्तक घेऊ शकता की नाही.

तुमच्या घरात किती लोक राहतात हे त्यावर अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही मुलं सांभाळायला आया जरी ठेवलात तरीही मूल दत्तक मिळणार नाही. म्हणजे ऑफिसला जाताना किंवा तुमच्या गैरहजेरीत किंवा तुमच्यासोबत काही घडल्यास त्या मुलाची काळजी कोण घेईल हे सांगणं गरजेचं आहे. सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर एजन्सी संबंधित राज्याला कळवेल. यानंतर पुढील दोन वर्षे एजन्सीचे लोक तुमच्या घरी येतील आणि मुलाला वाढवताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते तुमच्यापासून मुलाला घेऊन जाऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.