असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सचा (Association for Democratic Reforms ADR) २०१९ - २० चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार भारतातील सात राजकीय पक्षांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाली आहे. त्यात सर्वात वरचा क्रमांक हा दोन टर्म केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा (BJP) लागतो. सात राजकीय पक्षांची एकूण मालमत्ता ही ६,९८८.५७ कोटी रूपये इतकी आहे. त्यात मालमत्तेपैकी ४,८४७.७८ कोटी रूपयांची मालमत्ता एकट्या भाजपची आहे. म्हणजे सात पक्षांची मिळून जेवढी मालमत्ता होते त्याच्या ६९ टक्के मालमत्ता ही एकट्या भाजपची आहे. (ADR report says BJP Share of all national parties Total assets is 69 percent in FY 2019-20)
मालमत्तेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर बहूजन समाज पक्ष (BSP) आहे. त्यांची एकूण मालमत्ता ही ६९८.३३ कोटी इतकी आहे. त्यानंतर भारतातील दुसरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचा (Congress) नंबर लागतो. एडीआर रिपोर्टनुसार त्यांची एकूण मालमत्ता ही ५८८.१६ कोटी इतकी आहे.
एडीआर रिपोर्ट (ADR Report) शुक्रवारी प्रकाशित करण्यात आला. या रिपोर्टनुसार सात राजकीय पक्षांच्या एकूण मालमत्तेत मोठी वाढ दिसून येत आहे. भारतातील प्रमुख सात राजकीय पक्षांची मालमत्ता २०१६-१७ ला ३,२६०.८१ कोटी होती. ती २०१७-१८ मध्ये वाढून ३,४५७.६५ कोटी इतकी झाली. २०१८-१९ मध्ये ही मालमत्ता ५.३४९.२५ कोटी एवढी वाढली. २०१९ - २० मध्ये आता ती ६,९८८.५४ कोटी रूपये इतकी झाली आहे. या सात राजकीय पक्षामंध्ये भाजप (BJP), बसप(BSP), काँग्रेस(Congress), सीपीएम(CPM), तृणमूल काँग्रेस(AITC), सीपीआय (CPI) आणि एनसीपी (NCP) यांचा समावेश आहे.
भाजपने २०१८-१९ मध्ये आपली एकूण मालमत्ता २,९०४.१८ कोटी इतकी असल्याचे घोषित केले होते. ती आता २०१९-२० मध्ये तब्बल ६७ टक्क्यांनी वाढून ४,८४४.७८ कोटी इतकी झाली आहे. जरी एकूण सात राजकीय पक्षांच्या मालमत्तेत वाढ दिसून येत असली तरी भाजप साडून इतर पक्षांच्या मालमत्तेत घट झाल्याचे दिसत आहे.२०१८-१९ ते २०१९-२० या काळात काँग्रेसची एकूण मालमत्ता ९२८.८४ कोटी वरून कमी होत ५८८.१६ कोटी इतकी खाली आली आहे. तर बीएसपीची मालमत्ता ६९८.३३ कोटी रूपयांवरून आली आहे. राजकीय पक्षांच्या घोषित मालमत्तेत स्थावर मालमत्ता, कर्ज आणि अॅडव्हान्स, एफडीआर/डिपॉजीट, टीडीएस, गुंतवणूक आणि इतर मालमत्तांचे समावेश आहे.
एडीआरच्या २०१९-२० च्या रिपोर्टनुसार ४४ स्थानिक पक्षांनी जाहीर केलेली एकूण मालमत्ता ही २,१२९.३८ कोटी इतकी आहे. यातील १० टॉप राजकीय पक्षांचा वाटा ९५.२७ टक्के इतका आहे. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात समाजवादी पक्षाची मालमत्ता ही ५६३.४७ कोटी इतकी होती. तर तेलंगणा राष्ट्र समितीची मालमत्ता ३०१.४७ कोटी इतकी होती. याच आर्थिक वर्षात अण्णा द्रमुकची एकूण मालमत्ता ही २६७.६१ कोटी रूपये इतकी होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षात स्थानिक राजकीय पक्षांच्या मालमत्तेत सर्वात वरचा क्रमांक समाजवादी पक्षाचा होता. त्यांची मालमत्ता ५७२.२१ कोटी इतकी होती. त्यानंतर बीजू जनता दल २३२.२७ कोटी आणि अण्णा द्रमुक २०६.७५ कोटी यांचा नंबर लागत होता.
एडीआरच्या अहवालाचे विश्लेषण केले असता राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांनी २०१९-२० मध्ये जाहीर केलेल्या मालमत्तेत फिक्स डिपॉजीटच्या रूपातील रक्कम ही ५,९७०.५९ कोटी रूपये इतकी आहे. ही राजकीय पक्षांच्या एकूण मालमत्तेच्या ६५.४८ टक्के इतकी आहे. त्यानंतर १,३६३.८७ कोटी (१४.९६ टक्के) ही स्थावर मालमत्तेच्या श्रेणीतील आहे. तर ९४६.५७ कोटी (१०.३६ टक्के) ही इतर मालमत्तेत मोडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.