काबूल: जागतिक रेडिओ दिन जगभर साजरा होऊन दोन दिवस उलटले असताना अफगाणिस्तानमधील नभोवाणी केंद्रांमधील अंधार कायम आहे. तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून गेल्या सहा महिन्यांत ८६ नभोवाणी केंद्रे बंद पडली आहेत.सत्तांतरामुळे एकूणच प्रसार माध्यमांना फटका बसला आहे. यास आर्थिक आणि राजकीय कारणीभूत असल्याचे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी म्हटले आहे.
रेडिओ जहाँ हे बंद पडलेल्या नभोवाणी केंद्रांपैकी एक आहे. या केंद्राचे प्रमुख मोसावर रसीख यांनी सांगितले की, गेल्या ऑगस्टपासून आमचे कार्यक्रम बंद आहेत.पत्रकार संघटनेची जगाला सादअफगाण स्वतंत्र पत्रकार संघटनेचे प्रमुख होजातुल्लाह मुजादिदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आर्थिक पाठबळाची साद दिली. ते म्हणाले की, आम्ही आढावा घेतला आहे. त्यानुसार बाहेरून निधी मिळाला नाही तर येत्या सहा महिन्यांत अनेक नभोवाणी केंद्रे बंद पडतील. देशातील माध्यमे कोसळली असल्याचेच यातून स्पष्ट होते.
करवसुली मात्र सुरूच
झमझमा नभोवाणी केंद्राचे प्रमुख शफीउल्लाह अझिझी यांनी सांगितले की, देशातील सुमारे ७० टक्के केंद्रे बंद आहेत. आर्थिक आव्हाने आणि सध्याच्या परिस्थितीत कार्यक्रमांचे प्रसारण ही मुख्य कारणे आहेत. दुसरीकडे सरकार मात्र करवसुली करण्यावर ठाम आहे.
आठवणी गुपचूप रेडिओ ऐकण्याच्या
तांत्रिक पातळीवर प्रसार माध्यमांनी अनेक नवी व्यासपीठे निर्माण केली असली तरी अजूनही काही देशांत अजूनही नभोवाणी हे लोकप्रिय माध्यम आहे. यात अफगाणिस्तानचा समावेश आहे. वर्दाक गावातील एक नागरिक मंगल यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, रेडीओबाबत आमच्या असंख्य आठवणी आहेत. एके काळी रेडिओ ऐकण्यावर निर्बंध होते, पण आम्ही गुपचूप रेडिओ ऐकायचो. त्यासाठी गुप्त ठिकाणाबाहेर एखाद्या परिचिताला पहारा देण्यासाठी थांबवायचो. याच गावातील आणखी एक नागरिक अब्दुल सलीम म्हणाले की, ही फार जुनी गोष्ट आहे. तेव्हा मी लहान होतो. आमच्या गावात रेडिओ आणण्यात आला. गावकरी मन लावून कार्यक्रम ऐकायचे. तेव्हा मला वाटायचे की रेडिओ संचाच्या आतमध्ये लोक बसलेले आहेत आणि ते बोलतात. अफगाणिस्तानमध्ये १९२६ मध्ये अमानुल्ला खान राजा असताना रेडिओ आला. पहिल्या नभोवाणी केंद्राचे नाव रेडिओ काबूल असे ठेवण्यात आले. काबूलमधून कार्यक्रम प्रसारित केले जाऊ लागले.
तीनशेपेक्षा जास्त संस्था बंद
टोलो न्यूजनुसार तालिबान सत्तेवर आल्यापासून गेल्या ऑगस्टपासून प्रसार माध्यम क्षेत्रातील तीनशेपेक्षा जास्त विविध संस्था बंद पडल्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.