दोन्ही डोळे काढून सहा गोळ्या झाडल्या, अफगाण महिलेचं दु:खं

Terrorist
Terroriste sakal
Updated on

नवी दिल्ली : आधी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही डोळे काढले. इतकंच नाहीतर बंदुकीतून सहा ते सात गोळ्याही झाडल्या. पण, तिने स्वतःला वाचविलं. हे सांगताना तिच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. ही कहाणी आहे, तालिबान्यांच्या (taliban attack on Afghanistan) तावडीतून स्वतःची सुटका करणाऱ्या अफगाण महिला (Afghan woman) खातिराची.

Terrorist
Afghanistan crisis : राष्ट्रपती घनीचा भाऊ तालिबानमध्ये

तालिबानची क्रूरता सर्वांनाच माहिती आहे. मात्र, महिलांचे अधिकार अबाधित राहतील, असा दावा तालिबान्यांनी केला होता. मात्र, आता तो फोल ठरतोय. खातिरासोबत केलेल्या कृत्यावरून तालिबान्यांचा कट्टरतावाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या ८ महिन्यांपासून खातिरा ही दिल्लीतील कस्तुरबा नगर येथे आपल्या डोळ्यांसाठी उपचार घेत आहे. तालिबान्यांमुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. NDTV ने तिची मुलाखत घेतली असता तिने तिची कहाणी सांगितली.

खातिराचे तीन मुले गजनी शहरात असून लहान मुलगा आणि पतीसोबत उपचारासाठी ती भारतात आली. खातिरा अफगाणिस्तान पोलिसांत कर्तव्यावर होती. त्यावेळी तालिबानने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध केला असता त्यांना सहा गोळ्या घातल्या आणि त्यांच्या डोळ्यांना देखील इजा केली. त्यांनी कशीतरी स्वतःची सुटका करून घेत जीव वाचविला. मात्र, आता पुन्हा त्यांना तालिबानची भीती वाटत आहे. तालिबानने काबुलवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानी सातत्याने तिच्या घरी गजनीला जाऊन चौकशी करत आहेत. तसेच त्यांनी पोलिस आणि सैन्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या घरासमोर पहारा देखील वाढविला आहे. त्यामुळे खातिराच्या कुटुंबीयांना भीती वाटत आहे. भारतात उपचारासाठी आलेले अनेक अफगाणि नागरिक घाबरलेले आहेत. यापैकी जास्तीत जास्त नागरिक भारत किंवा दुसऱ्या देशात कायमचे स्थायिक होण्याचा विचार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()