अफगाणमधील भारतीयांना बाहेर काढू; राजदूत गुजरातला परतले

अफगाणमधील भारतीयांना बाहेर काढू; राजदूत गुजरातला परतले
Updated on
Summary

गुजरातच्या जामनगर इथं भारताचे राजदूत अफगाणिस्तानमधून पोहोचले. त्यांनी भारतीय हवाई दलाचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर भारताचे राजदूत तिथून परत आले आहेत. रुद्रेंद्र टंडन यांनी म्हटलं की,'अफगाणिस्तानमधील वातावरण वेगाने बदलत आहे.' मंगळवारी सकाळी गुजरातच्या जामनगर इथं रुद्रेंद टंडन पोहोचले. त्यांनी भारतीय हवाई दलाचे आभार मानले आहेत. तसंच ते म्हणाले की, अजुन अफगाणिस्तानमध्ये काही भारतीय आहेत. तिथल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. एअर इंडियाचे विमान उड्डाण सुरु राहणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.

जामनगर इथं पोहोचल्यानंतर भारताचे राजदूत टंडन यांनी सांगितलं की, असं नाही की आम्ही अफगाणिस्तानमध्ये लोकांना सोडून दिलं आहे. त्यांचे हित आणि त्यांच्यासोबतचं नातं आम्हाला माहिती आहे. आम्ही सातत्यानं त्यांच्या त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तिथली परिस्थिती कशी बदलत आहे हे मी सांगू शकत नाही असे ते म्हणाले. काबुलमधील भारतीय दुतावासातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढणं सोपं नव्हतं अशीही माहिती समोर आली आहे.

अफगाणमधील भारतीयांना बाहेर काढू; राजदूत गुजरातला परतले
तालिबानींमध्ये भारतीय देखील? शशी थरुरांचं ट्विट चर्चेत

टंडन म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितवर लक्ष ठेवून आहे, कारण अजुनही तिथे काही भारतीय आहेत. जोपर्यंत काबुलचे विमानतळ सुरु असणार आहे तोपर्यंत एअर इंडिया त्यांची सेवा देणार आहे. विमानतळाची परिस्थिती पाहता एअर इंडियाने त्यांची विमान उड्डाणे बंद केली होती. मात्र अद्याप तिथे अडकलेल्या लोकांना कसे परत आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्प डेस्कसुद्धा सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.