थिरुवअनंतपुरम : जगातील काही देशांमध्ये उद्रेक झालेल्या मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये नुकताच आढळून आला होता. यानंतर आता अफ्रिकन स्वाइन फिवर या आजाराच्या रुग्णाचीही केरळमधील वायनाड इथं नोंद झाली आहे. केरळचे पशुपालन मंत्री जे चिंचुरानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. (African Swine Fever reported in Kerala Wayanad)
वायनाड येथील एका डुक्करांच्या फार्ममध्ये या आजाराचा फैलाव झाल्याचं मंत्र्यांनी निश्चित केलं आहे. पण अद्याप या तापाच्या आजाराची किती डुक्करांना लागण झाली आहे, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. अफ्रिकन स्वाइन फिवरची लागण झालेस डुक्करांमध्ये ताप, सर्दी आणि हागवण अशी लक्षण दिसून येत आहेत. या आजाराचे नमुने पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
भारतात पहिल्यांदा या राज्यात झाली होती नोंद
जुलै महिन्यात उत्तराखंडमध्ये या अफ्रिकन स्वाइन फिवरची नोंद झाली होती. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असून त्यावर अद्याप लस उपलब्ध नाही. या आजाराच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारनं जनतेला पोर्क मांस न खाण्याचा सल्ला दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आसाम, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरात या आजाराची नोंद झाली होती. एप्रिलमहिन्यात त्रिपुरामध्ये ६३ पूर्ण वाढ झालेल्या फार्ममधील डुक्करांचा अज्ञात कारणामुळं मृत्यू झाला होता. तेव्हाच या आजाराची घंटा वाजू लागली होती. या आजाराची पहिल्यांदा भारतात नोंद झाली ती मे २०२० मध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेशात आढळून आले होते.
माणसावर हानिकारक परिणाम नाही
या आजाराचा माणसावर हानिकारक परिणाम होत नाही पण तो डुक्करांसाठी जीवघेणा आजार असल्याचं सांगितलं जात आहे. हा आजात सातत्यानं जगभरात पसरत आहे, ज्यामुळं डुक्करांच्या आरोग्याला धोका आहे, असं आरोग्य संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.
या देशांमध्ये झाला फैलाव
आशिया, कॅरिबिअन राष्ट्रे, युरोप या भागात या आजाराचा फैलाव झाला असून यामुळं फार्म पिग आणि वाईल्ड पिग या दोन्हींसाठी याचा मोठा धोका आहे. सन २००५ मध्ये या आजाराचा फैलाव ७३ राष्ट्रांमध्ये झाल्याची नोंद झाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.