Shraddha Murder Case : आई-वडिलांसोबतच्या शेवटच्या संवादात श्रद्धा म्हणाली, विसरा मी तुमची मुलगीये अन् तिनं..

श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले.
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal
Updated on
Summary

श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले.

Shraddha Murder Case : दिल्लीत घडलेल्या एका हत्याकांडानं देशभरात खळबळ उडालीय. आफताब अमीन पूनावाला या नराधमानं त्याच्यासोबत ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरचा (Shraddha Walkar) गळा दाबून हत्या केली. इतकंच नाही, तर हे कृत्य लपवण्यासाठी त्यानं तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते दिल्लीतील जंगल परिसरात विविध ठिकाणी फेकले.

या घटनेनं देश हादरला आहे. डोकं सुन्न करणाऱ्या या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या घटनेला धार्मिक रंग देत ‘लव्ह जिहाद’ चं प्रकरण म्हटलंय. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आफताबविरोधात पुरावे गोळा करत आहे. श्रद्धा वालकर ज्या मुलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, त्याचं नाव आफताब पूनावाला (Aftab Amin Poonawala) होतं. श्रद्धाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. जेव्हा श्रद्धा तिच्या पालकांशी शेवटचं बोलली तेव्हा ती म्हणाली, मी 25 वर्षांची आहे. मला स्वतःसाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला आफताब पूनावालासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे, त्यामुळं आजपासून तुम्ही विचार करू शकता की मी तुमची मुलगी नाहीये. मी माझी काळजी स्वत: घेऊ शकते, असं तिनं म्हटलं होतं.

Shraddha Murder Case
Amit Shah : गुजरात निवडणुकीपासून ते समान नागरी कायद्यापर्यंत..; अमित शाहांनी मांडले 10 खास मुद्दे

श्रद्धानं 2019 मध्ये सोडलं घर

श्रद्धाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, ती 2019 मध्ये मुंबईहून घर सोडली होती. श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांकडं दिलेल्या तक्रारीत ही माहिती दिली असून एफआयआरमध्ये त्याचा उल्लेख आहे. रिपोर्टनुसार, 18 मे रोजी श्रद्धाची हत्या झाली होती. तिची हत्या केल्यानंतर श्रद्धाचा प्रियकर आफताब यानं मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि तीन महिने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याचा आरोप आहे.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : मुस्लिम तरुण हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढताहेत; भाजप नेत्याला 'लव्ह जिहाद'चा संशय

श्रद्धाच्या कुटुंबीयांचा 'त्या' नात्याला तीव्र विरोध

श्रद्धाच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. त्यांनी श्रद्धाला या नात्यात राहू नको, असं समजावलं. मात्र, संतापलेल्या श्रद्धानं तिच्या कुटुंबीयांशी बोलणंच बंद केलं. ती मुंबई सोडून दिल्लीत आली. श्रद्धाच्या वडिलांचं म्हणणं आहे की, मी मुलीला समजावून सांगितलं. पण, ती स्वतःची काळजी घेऊ शकते असं श्रद्धा म्हणाली. आफताब जिथं राहत होता, त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, आफताबची वर्तणूक खूप वेगळी होती. तो खूप कमी बोलायचा. आफताबच्या घरातून भांडणाचा खूप आवाज यायचा, असंही शेजाऱ्यानं सांगितलं.

वडिलांची पोलिसांत तक्रार

जेव्हापासून श्रद्धा आफताबच्या संपर्कात आली. तेव्हापासून तिचे कुटुंबीयांशी संबंध तुटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, श्रद्धा तिच्या कुटुंबाच्या संपर्कात नव्हती. अनेक महिने तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने तिचे वडील चिंतेत होते. श्रद्धाच्या मैत्रिणींनीही ती संपर्कात नसल्याचं सांगितल्यावर वडिलांची चिंता वाढली. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांत तक्रार केली. श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.