भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दहशतीदरम्यान, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्याचे समोर येत आहे.
पहिल्या लाटेनंतर कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेने जगभरात हाहा:कार माजवला होता. दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांचा मृत्यू झाला. हा अनुभव लक्षात घेता, आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron) जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. हा नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरत असल्याने भारतातही (India) त्याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. मात्र, ओमिक्रॉनची जगभरात दहशत सुरू असताना भारतात कोव्हिड-19 च्या नवीन प्रकरणांत घट होत असल्याचे दिसून येत आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भारतासाठी दिलासादायक आहे. (After 561 days, the number of corona patients in India started declining)
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दहशतीदरम्यान, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्याचे समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 350 नवे रुग्ण आढळले असून 202 जणांचा मृत्यूही झाला आहे. हे दोन्ही आकडे आदल्या दिवसाच्या तुलनेत कमी आहेत. देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्णही दिवसेंदिवस कमी होत आहेत, ही दिलासादायक बाब आहे. आता रुग्णांची संख्या 91 हजार 456 इतकी आहे, जी गेल्या 561 दिवसांतील सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7 हजार 973 रुग्ण बरे झाले आहेत.
यासह आतापर्यंत देशात एकूण 3 कोटी 41 लाख 30 हजार 768 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी, कोरोनाने देशात आतापर्यंत 4 लाख 75 हजार 636 लोकांचा बळी घेतला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.