नवी दिल्ली : अमूलनंतर आता मदर डेअरी (Mother Dairy) ने देखील दुधाचे भाव वाढवले आहे. आता ग्राहकांना मदर डेअरचे दूध (Mother Dairy Milk New Price)नव्या वाढलेल्या किंमतीनुसारच खरेदी करावे लागेल. मदर डेअरने दिल्ली एनसीआरमध्ये दुधाच्या किंमतीमध्ये २ रुपयांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. ही वाढलेली किंमत येत्या रविवारपासून लागू होणार आहे.
डेअरीने सांगितले की, ''उत्पादनाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाच्या किंमतीमध्ये वाढ केली जात आहे. अमूल(Amul Milk Prices) , पराग मिल्क (Parag Milk Foods)फुड्सद्वारे दुधाच्या किंमतीमध्ये वाढ केल्यानंतर मदर डेअरीने भाव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल आणि परागने प्रति लीटर दुधासाठी दोन रुपयांनी दर वाढवले आहे
मदर डेअरीने एक किलो टोकन दूधाची किंमत दिल्ली एनसीआरमध्ये ४६ रुपये केली आहे जी याआधी ही किंमत ४४ रुपये होती. याच प्रकारे एक किलो पॅकसाठी फुल क्रीम दूधाची किंमत दूधाच्या किंमती ५७ रुपयांवरून वाढून ५९रुपये केली आहे तर टोन्ड दुधाचा दर ४७ रुपयांवरून ४९ रुपयांवर पोहोचला आहे. डबल टोन्ड दुधाचा दर 41 रुपयांवरून 43 रुपयांवर तर गायीच्या दुधाचा दर 49 रुपयांवरून 51 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, सुपर-टी दुधाचा अर्धा लिटर भाव 26 रुपयांवरून वाढवून 27 रुपये झाला आहे.
याआधी अमूल (Amul) आणि गोवर्धन या कंपन्यानी १ मार्चपासून दुधाच्या भाव वाढवले होते. देशाच्या प्रमुख एफएमसीजी डेअरी पराग मिल्क फुड्स
लिमटेडने गोवर्धन ब्रँन्डच्या(Parag Milk Foods Ltd) गायीच्या दुधाच्यी किंमतीमध्ये दोन रुपये प्रति लीटर वाढ करण्याची घोषणा केली होती. यामध्ये वाढीनंतर गोवर्धन गोल्ड( Gowardhan Gold) मिल्कची किंमत ४८ रुपयांवरून वाढून ५० रुपये झाली आहे. अशा प्रकारे गोवर्धन फ्रेश (Gowardhan fresh) किंमत ४६ रुपयांपासून ४८ रुपयांवर पोहचला आहे.
अमूल ब्रँडचे संचालन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) एका निवेदनात म्हटले आहे की वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किमतीमुळे किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.