B.Sc नंतर तरुण करतो मशरुमची शेती, महिन्याला कमावतो ४० लाख

आज नवीन राणा दरमहा 40 लाख रुपयांपर्यंतचा व्यवसाय करतो.
Navin Rana
Navin Ranasakal
Updated on

जेव्हा आपण कॉलेजमधून उत्तीर्ण होतो, तेव्हा सर्वप्रथम आपण नोकरीचा शोध घेतो परंतु हरियाणात राहणाऱ्या नवीन राणाने (Navin Rana) तसे केले नाही तर कॉलेजमधून बाहेर पडताच त्याने व्हाईट बटन मशरुमची लागवड सुरू केली. आणि आश्चर्यकारक म्हणजे तो आज दरमहा 40 लाख रुपयांपर्यंतचा व्यवसाय करत आहे. घवघवीत यश मिळवणाऱ्या नवीन राणाने या व्यवसायाची सुरुवात एवढ्या कमी वयात केली, हे नक्कीच प्रेरणादायक आहे. (After bsc a young man started white button mushroom cultivation he earns 40 lakhs every month)

कॉलेज संपताच मशरुमची लागवड सुरू केली.

नवीनने 2019 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून बी.एस.सी. (BSC) IT मध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्याने काम केले नाही तर त्याचे मोठे काका 1996 पासून मशरूमची लागवड करत होते. नवीनने काकांपासून प्ररित होत नोकरी न करता मशरूमची शेती करण्यास सुरवात केली.

Navin Rana
UP मध्ये अल्पवयीन मुलाला पाय चाटायला लावले : 7 जणांना अटक

नवीनला कामातून चांगले उत्पन्न मिळत आहे

नवीन सांगतो की, जर त्याने नोकरी केली असती तर महिन्याला 35-40 हजार रुपये कमावले असते पण आता तो लाखात कमावतोय. यासोबतच गावातील लोकांना रोजगारही देत असल्याचे त्याला समाधान आहे. त्याच्यासोबत 15 लोक रोज काम करतात. नवीन याने 2500 चौरस क्षेत्रात मशरुमची लागवड केली आहे. तो सांगतो की एकूण व्यवसायाच्या 20% पर्यंत तो नफा मिळवतो.

Navin Rana
'मुंबईत तुमची ताकद नसल्याने कोणाला तरी उभं केलंय, हे दंगली घडवण्याचं षडयंत्र'

दिल्ली-चंदीगडमध्ये जास्तीत जास्त विक्री

नवीन राणा दिल्ली-चंदीगड बाजारपेठसाठी मशरुमचा पुरवठा करतात. सुरुवातीला कमी उत्पादन होते, मात्र आता हळूहळू ते प्रतिदिन १० क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे नवीन म्हणाला.

मशरूम लागवडीची प्रक्रिया

मशरूमच्या लागवडीसाठी तापमान हा सर्वात मोठा घटक असल्याचे नवीन सांगतो. यासाठी तापमान 15 ते 20 अंश असावे. लेयर वाइज शेड बनवून आपण मशरुमची लागवड करू शकतो. तापमान मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला एसी लावता येतो. मशरुमच्या विविध जातींच्यी लागवडीसाठी वेगवेगळे तापमान आवश्यक असते. सर्वप्रथम आपण त्याच्या लागवडीसाठी कंपोस्ट खत तयार करतो. यासाठी गव्हाचा भूसा, तांदळाचा कोंडा, सल्फर नाइट्रेट, जिप्सम कोंबडीचे खतचा वापर केला जातो.

Navin Rana
अमरनाथ यात्रेसाठी 'TRF'कडून धमकी, सरकार राजकारण करत असल्याचा आरोप

एका पिशवीतून 2 ते 3 किलो मशरूम निघतात

कंपोस्ट तयार झाल्यानंतर, ते पिशव्यामध्ये भरले जाते आणि त्यात मशरुमच्या बिया मिसळवतात. मग बनवलेल्या रॅकवर पिशव्या एका रांगेत ठेवल्या जातात. सुमारे 15 दिवसांनी पॉली बॅग उघडली जाते. यामध्ये इतर खते म्हणजे नारळाचे पिट्स आणि धान्याचे जळलेले भुसे मिसळवले जातात आणि दररोज वरून थोडेसे पाणी ओतले जाते.

सुमारे 2 महिन्यांनी या पिशवीतून मशरूम बाहेर येतो. एका पिशवीतून सुमारे 2-3 किलो मशरुम बाहेर पडतात. दिवसेंदिवस मशरुमचे प्रमाण वाढू लागले की क्षेत्रानुसार प्रमाण दररोज हजार किलोग्रॅमपर्यंत जाऊ शकते

Navin Rana
Amway India वर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त

नवीनला मशरुम शेतीचे प्रशिक्षण कुठे मिळाले?

नवीन सांगतो की, देशात अशा अनेक संस्था आहेत जिथे मशरुम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी प्रमाणपत्र आणि पदवी स्तरावर अभ्यासक्रमही आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यात काही सरकारी आणि खाजगी संस्था आहेत, जिथे याचे प्रशिक्षण दिले जाते. यासंदर्भातील माहिती जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातून मिळू शकते. यासोबतच अनेक शेतकरी वैयक्तिक पातळीवर प्रशिक्षणही देतात. इंटरनेट आणि यूट्यूब वरून देखील आपण याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.