CMO नंतर UP सरकारचे ट्विटर अकाउंटही हॅक; डीपी बदलून केले ट्विट

Yogi Adityanath
Yogi Adityanathsakal
Updated on

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर आज यूपी सरकारचे अधिकृत ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले. यूपी सरकारचे अकाउंट हॅक करून अनेक ट्विटही करण्यात आले. इतकंच नाही तर हॅकर्सनी ट्विटर अकाऊंटचा डीपी बदलून त्या जागी कार्टूनचे फोटो लावले. मात्र अकाउंट ताबडतोब रिस्टोर करण्यात आले आणि अशा प्रकारचे ट्विट काढून टाकण्यात आले आहेत.

सीएमओचे ट्विटर अकाउंट शनिवारी हॅक झाले

याआधी, शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे (CMO) ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. अज्ञात हॅकर्सनी यूपी CMO Twitter हँडल वापरून " ट्विटरवर आपले BAYC/MAYC animated कसे चालू करावे" या नावाच्या ट्युटोरियल संबंधीत पोस्ट पब्लिश केली. याव्यतिरिक्त, UP CMO खात्यावर एक कार्टुनिलृस्ट फोटो प्रोफाइल फोटो म्हणून लावण्यात आला. अज्ञात हॅकर्सनी UP CMO खात्यावर काही असबध्द ट्विटचा थ्रेड देखील पोस्ट केला. मात्र, लवकरच यूपी सीएमओ खाते रिस्टोर करण्यात आले. मात्र आता दोन दिवसांनी यूपी सरकारचे अकाउंट हॅक झाले आहे. यूपी सीएमओ (@CMOfficeUP) च्या ट्विटर अकाउंटचे 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Yogi Adityanath
…तर कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होतील; श्रीलंकेतील डॉक्टरांचा इशारा

केंद्र सरकारची 600 हून अधिक खाती हॅक

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची 600 हून अधिक सोशल मीडिया खाती हॅक करण्यात आली आहेत. सरकारचे ट्विटर हँडल आणि ईमेल अकाऊंट हॅक करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की 2017 पासून तब्बल 641 खाती हॅक झाली आहेत.

त्यावर त्यांनी वर्षानुवर्षे हॅकिंगच्या प्रकरणांची माहिती देताना लेखी उत्तरात सांगितले की, 2017 मध्ये 175 खाती, 2018 मध्ये 114 खाती हॅक झाली, 2019 मध्ये 61 खाती, 2020 मध्ये 77, तर 2021 मध्ये 186 खाती हॅक झाली. चालू वर्षात 28 सरकारी खाती हॅक झाली आहेत. ठाकूर म्हणाले की इंडियन कंप्युटर एमर्जंसी टीम (CERT-In) ने ही माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) उपलब्ध करून दिली आहे.

Yogi Adityanath
"...कुठल्याही सणाच्या दिवसांमध्ये मांसाहारावर बंदी नको"- जितेंद्र आव्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.